पुणे

विद्युत खांबाला धडकून कापडदऱ्यात अपघात

CD

पारगाव, ता. ११ : कापडदरा (ता. आंबेगाव) येथे पोंदेवाडी फाटा ते मंचर रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबाला मोटार धडकून अपघात झाला. या अपघातामध्ये तिघेजण किरकोळ जखमी झाले असून, मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे.
मंचर- शिरूर रस्त्यावर वैदवाडी फाटा ते पोंदेवाडीदरम्यान कापडदरा येथे बुधवारी (ता. १८) सकाळी सात वाजण्याचा सुमारास रस्त्यालगत असलेल्या विद्यूत खांबाचा अंदाज न आल्याने मोटार (क्र. एमएच १२ व्हीवो ६७५९) खांबाला धडकली. त्यामुळे ३३ केव्हीची विद्यूत तार तुटली व त्याठिकाणी मोठा जाळ झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मोटारीमधील वाल्मीक गवळी व त्यांचा मुलगा वंश वाल्मीक गवळी व आणखी एक (नाव समजले नाही) हे तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.
या रस्त्यालगत असणाऱ्या विद्यूत खांबामुळे याअगोदरही छोटेमोठे अपघात झाले आहेत. या ठिकाणी असणारा विद्यूत खांब वाहतुकीला मोठा अडथळा ठरत असल्याने हा विद्यूत खांब महावितरण कंपनीने एखाद्या मोठ्या अपघाताची वाट न पाहता त्वरित दुसऱ्या ठिकाणी हलवावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

06628

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Defamation Case : इंस्टाग्रामवर नितीन गडकरी यांची बदनामी; आयटी सेलच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Akola News : बिश्नोई गॅंगचा धक्कादायक खंडणी कॉल!आमदाराकडे २ कोटींची मागणी; भाजप शहराध्यक्षाला जीवघेणी धमकी

Amravati MD Drugs Seized : अमरावतीत महिन्याभरात तिसऱ्यांदा एमडी ड्रग्स जप्त ; तस्करीची पाळेमुळे खोलवर रुतलेली

Shiv Jayanti Mohol : मोहोळ तालुक्यात 40 ठिकाणी "एक गाव एक शिवजयंती" उपक्रम विविध मंडळांचा सामाजीक उपक्रमावर भर

Vasai Vasai News : वसईत सीरियल शूटिंग सेटला आग, स्टुडिओचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT