पुणे

वडगावपीरमध्ये आजपासून पीरसाहेब यात्रा उत्सव

CD

पारगाव, ता.१० : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या वडगावपीर (ता. आंबेगाव) येथील श्री पीरसाहेब यात्रा उत्सव बुधवार (ता. ११) ते शुक्रवार (ता. १३) या काळात आयोजित करण्यात आला आहे. संदल, बैलगाडा शर्यती, तमाशा आणि कुस्त्यांचा आखाडा हे या यात्रेचे मुख्य आकर्षण असणार आहे.
उत्सवाची सुरुवात बुधवारी सायंकाळी सहा वाजता संदल कार्यक्रमाने होणार आहे, अशी माहिती हजरत दावल मलिक दर्गा ट्रस्टचे हनिफ मुजावर यांनी दिली. गुरुवारी (ता. १२) सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत बैलगाडा शर्यती रंगतील. रात्री ९ वाजता विठाबाई भाऊ नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा, तर शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी ५ वाजता विठ्ठल मैदानावर कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन वडगावपीर-मांदळेवाडी ग्रामस्थ आणि शिवछत्रपती ग्रामविकास प्रतिष्ठानने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून अम्पायरसोबत वाद Video

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT