पारगाव : मजुरांची टंचाई आणि वाढत्या मजुरीवर मात करण्यासाठी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गव्हाच्या मळणीसाठी हार्वेस्टरचा वापर वाढला आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा यंत्राद्वारे अवघ्या अर्ध्या तासात एकरभर मळणी होत असल्याने शेतकऱ्यांचा कल यांत्रिकीकरणाकडे झुकला आहे.
सध्या परिसरात रब्बी हंगामातील गहू काढणीची लगबग सुरू आहे. पूर्वी एक एकर गहू काढण्यासाठी १० ते १२ मजूर आणि मोठा खर्च लागत असे. आता हार्वेस्टरमुळे हे काम तासाभरात पूर्ण होऊन धान्य थेट घरी येत आहे.
पोंदेवाडी येथील शेतकरी नीलेश पडवळ यांनी सांगितले की, हार्वेस्टरमुळे मळणी सोपी झाली असून एकरी सरासरी १० ते १२ क्विंटल उत्पादन मिळत आहे.
पूर्वी पंजाब-हरियानातून येणाऱ्या या यंत्रांची जागा आता स्थानिक तरुणांनी घेतली आहे. निमगाव सावा येथील हार्वेस्टर मालक गणेश भापकर यांच्या माहितीनुसार, आंबेगाव व जुन्नर तालुक्यात सुमारे ४० हार्वेस्टर कार्यरत आहेत. एकरी ३ ते ४ हजार रुपये दराने ही मळणी केली जात असून, यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचत आहेत.
06716
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.