पुणे

जुन्नर बाजार समिती दर्जेदार सुविधा देणार

CD

आपटाळे, ता. ३० : जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून अत्याधुनिक व दर्जेदार सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे यांनी केले.
जुन्नर येथे बाजार समितीच्या आवारात वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ॲड. काळे बोलत होते. काही दिवसांपूर्वी नारायणगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदी केलेल्या जमिनीवरून विद्यमान तीन संचालकांनी आरोप करत हा व्यवहार रद्द करण्यासाठी मोर्चा काढला होता. त्यामुळे या वार्षिक सभेत मोठा गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र किरकोळ अपवाद वगळता सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी माजी आमदार अतुल बेनके, आशा बुचके, संतोष खैरे, दिलीप गांजाळे, अशोक घोलप, गुलाब पारखे, प्रकाश ताजणे, विनायक तांबे, संतोष तांबे, दिलीप डुंबरे, सचिव रुपेश कवडे यांसह बाजार समितीचे संचालक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचलन तुषार थोरात यांनी केले. प्रकाश ताजणे यांनी आभार मानले.
दरम्यान, वार्षिक सभा सुरू झाल्यानंतर विषयपत्रिकेवरील दुसऱ्या विषयाचे वाचन सुरू असताना एका शेतकऱ्याने प्रश्न विचारण्यासाठी माईक हाती घेतला होता. त्यावेळी सभापती ॲड. काळे यांनी विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतर ऐनवेळच्या विषयात सूचना मांडण्यासाठी वेळ दिला जाणार असल्याचे सांगितले, तर काही सभासदांनी विषयपत्रिकेवरील विषयाचे वाचन होऊ द्या, नंतर आमचे म्हणणे घ्या, असे सुचवले. त्यातच विद्यमान एका संचालकाने सभासदाच्या हातातून माईक ओढण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी थोडा वादंग निर्माण झाला होता, मात्र सभापती ॲड. काळे, माजी आमदार बेनके व आशा बुचके यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले.
यावेळी अतुल बेनके म्हणाले, ‘‘जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती देशातील नावाजलेली आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे.’’ ‘‘बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे,’’ असे आशा बुचके यांनी सांगितले. ‘‘नारायणगाव येथील जमीन खरेदी व्यवहार रद्द करावा,’’ अशी मागणी माजी सभापती रघुनाथ लेंडे यांनी केली.

शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या
याप्रसंगी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करणे, आळेफाटा येथील गाई बाजारात काँक्रिटीकरण करणे, बेल्हे आठवडे बाजारात काँक्रिटीकरण करणे, कोल्ड स्टोरेज व प्रोसेसिंग युनिट उभारणी, शेतकऱ्यांसाठी विमा लवकरात लवकर काढावा, बाजार समितीच्या माध्यमातून ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी ठराव करणे, आदी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ODI World Cup 2025: भारतीय संघाची विजयाने दणक्यात सुरुवात! दीप्ती शर्मा - स्नेह राणाची फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही कमाल

भीमा नदीतील पाण्यामुळे सीनेचा पूर ओसरेना! सोलापूर-विजयपूर महामार्ग आजही बंदच राहणार; उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

मोठी बातमी! ‘मकोका’ची कारवाई टाळण्यासाठी मागितली ६५ लाखांची खंडणी! कोल्हापुरातील सहायक फौजदारासह 5 जणांवर अकलूज पोलिसांत गुन्हा, दोघे अटकेत

Attacked on Ex Minister in Jail : खळबळजनक! माजी मंत्र्यावर तुरुंगात जीवघेणा हल्ला; डोक्याला गंभीर इजा!

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राची आकांशा नित्तूरे दुसऱ्या फेरीत; दिव्या भारद्वाजचीही आगेकूच

SCROLL FOR NEXT