पुणे

किल्ले शिवनेरीवर रंगला शिवजन्म सोहळा

CD

जुन्नर, ता. १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९६वा शिवजन्म सोहळा किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे उत्साहपूर्ण वातावरणात व जल्लोषात साजरा करण्यात आला. ‘जय जिजाऊ जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय’ या घोषणांनी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीचे वातावरण शिवमय झाले होते.
किल्ले शिवनेरी येथे सकाळी नऊच्या सुमारास गडावरील शिवकुंज येथील राजमाता जिजाऊ व बालशिवबा यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिवजन्मस्थळ येथे बालशिवबा यांच्या जन्माचा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बालशिवबा यांचा पाळणा जोजवून शिवजन्म सोहळा पार पडला. यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीने मान्यवरांचे औक्षण करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाच्या महिलांनी पारंपरिक वेशभूषा व पारंपरिक पद्धतीने पाळणा गीत गायन केले. शिवजन्माचा आनंद सोहळा उपस्थितांना सुंठवडा व पेढे वाटून साजरा करण्यात आला. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या पोलिस दलाच्या बँड पथकाकडून बंदुकीच्या फैरी झाडत छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओतूर क्रमांक एक व दोनच्या विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीम पथकाच्या माध्यमातून सादर केलेल्या शिवचरित्रावर आधारित प्रसंग सादर केले. त्याचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

शिवनेर भूषण पुरस्कारांचे वितरण
याप्रसंगी मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेत शासकीय शिवनेर भूषण पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय नौदलात सब लेफ्टनंटपदी निवड झालेली पिंपळवंडी गावची कन्या श्रुतिका प्रवीण ताथवडे, मद्रास ट्वेंटी रेजिमेंटमध्ये लेफ्टनंटपदी निवड झालेले वारूळवाडीचे सुपुत्र अजिंक्य संजय मेहेर यांच्या वतीने कुटुंबीय, खारघर येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे विभाग प्रमुख डॉ. विनोद सीताराम हांडे यांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल, जुन्नर तालुका पंचायत समितीचे अकरा वर्षे सभापती राहिलेले शिवाजीराव नामदेव खैरे यांना राजकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल; तर कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान राहिलेले प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी स्व. पंकज शिवाजी वामन यांच्यावतीने कुटुंबीयांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

SCROLL FOR NEXT