पुणे

चेंगराचेंगरीत आठ शिवभक्त जखमी

CD

जुन्नर, ता. १९ : शिवनेरी गडावरून मेणा दरवाजा व कुलूप दरवाजाच्या परिसरात परतीच्या मार्गावर असलेल्या शिवभक्तांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार घडल्याची घटना गुरुवारी (ता. १९) पहाटे दोनच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये दोन शिवभक्तांचे पाय फ्रॅक्चर झाले असून, अन्य काही शिवभक्त किरकोळ जखमी झाले आहेत.
शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून हजारो शिवभक्त आदल्या दिवसापासूनच किल्ले शिवनेरीवर येत असतात. गडावरील मेणा दरवाजा व कुलूप दरवाजा या परिसरात पहाटे दोनच्या सुमारास शिवभक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली. यामध्ये शंकर उत्तम राहणे (वय २६, रा. चंदनापुरी, संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांचा पाय फ्रॅक्चर झाला, तर दिगंबर वसंत क्षीरसागर (वय ३८, रा. मंचर, ता. आंबेगाव) यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. तसेच, भूषण विलास आरोटे (वय २२, रा. कोतूळ, ता. अकोले, अहिल्यानगर) यांचा मशाल अंगावर पडल्याने चेहरा किरकोळ भाजला. तर, आकाश काशिनाथ टेमगिरे (वय २९, रा. चाकण, ता. खेड), सागर संतोष वाजे (वय २४, रा. वडनेर वाजेवाडी), रेहान शेख (वय १९, रा. शिक्रापूर, ता. शिरूर), अनिकेत अरुण पानमंद (वय २८, रा. शिंदे, ता. खेड), दीपक गोडसे (वय ३०, रा. आळंदी, ता. खेड), हे युवक किरकोळ जखमी झाले.
दरम्यान, शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरी व परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतानाही अशी घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे, तर घटना घडली त्यावेळी पोलिस कर्मचारी हजर नव्हते, अशी चर्चा शिवभक्तांमध्ये होती. भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दाखल घ्यावी, अशी मागणी शिवभक्तांमधून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT