जुन्नर, ता. १५ : बारव पाडळी (ता. जुन्नर) येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर, घोडेगावचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी देवदूतासारखी मदत केली आहे. देसाई यांनी उपचारांची सर्व जबाबदारी स्वीकारल्याने गंभीर जखमी विद्यार्थिनी आता धोक्याबाहेर असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
बुधवारी (ता. ११) सकाळी साडेनऊच्या सुमारास कॉलेजला जात असताना एका युवकाने या विद्यार्थिनीवर कोयत्याने अमानुष हल्ला केला होता. यात तिच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. तिला तातडीने जुन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी रुग्णालयात धाव घेत सर्व वैद्यकीय खर्चाची जबाबदारी स्वतः आणि प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वीकारली.रविवारी (ता. १५) देसाई यांनी पत्नी सुनिधी देसाई यांच्यासह रुग्णालयात जाऊन विद्यार्थिनीच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनीही कुटुंबाला धीर दिला. पितृछत्र हरपलेल्या या विद्यार्थिनीची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने देसाई यांनी घेतलेल्या पुढाकाराचे आदिवासी समाजात कौतुक होत आहे.
विद्यार्थिनीची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. माणुसकीच्या नात्याने आम्ही आणि प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तिच्या संपूर्ण वैद्यकीय खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे.
- प्रदीप देसाई, प्रकल्प अधिकारी, घोडेगाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.