पुणे

खाचरे तुंबली, कामे खोळंबली

CD

भुकूम, ता. १६ : मुळशी तालुक्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे खाचरे पाण्याने तुंबली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची पावसाळ्यापूर्वीची शेतीच्या मशागतींची कामे खोळंबली आहेत. तसेच, जोरदार वाऱ्यामुळे फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुळशी तालुक्यात बुधवारी व गुरुवारी सलग दोन दिवस जोरदार पाऊस झाला. मुठा खोरे व भुकूम परिसरात पावसाचा जोर होता. पावसामुळे मुठा खोऱ्यात खाचरे तुडूंब भरली आहेत. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे रखडली आहेत. पावसाळ्यापूर्वी खाचरात भाताचे रोप तयार करणे, त्यासाठी कुळवणी व पेटारणी करणे, बांधाला शिग देणे, सांडव्यांची दुरुस्ती करणे, शेणखताची वाहतूक करून ते खाचरात टाकणे, जनावरांसाठी वैरण रचून ठेवणे, झाडांची विरळणी करण्याची कामे रखडली आहेत. शिवारात ट्रॅक्टर जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती झाली आहे.
जोरदार वारे व पावसामुळे आंबा, जांभूळ, फणस फळांचे मोठे नुकसान झाले. हापूस, पायरी, रायवळ आंब्याची झाडे उंच आहेत. जोरदार वाऱ्यामुळे अशा झाडांवरील फळे मोठ्या प्रमाणावर पडली आहेत. आंबा उतरणी करणे, आढी घालून पिकवणे, मार्केटला पाठवणे पावसामुळे शक्य होणार नाही.
दरम्यान, मुळशीतील आंबा हंगाम पंधरा मेपासून सुरू होतो. यावर्षी मोहोर कमी आला होती. त्यामुळे काही फळे लागली, ती वाऱ्यामुळे पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, जांभळ फळांची अशीच अवस्था झाली आहे. आंबा, जांभळ, फणस यातून तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्याना दरवर्षी चांगले उत्पन्न मिळते. मात्र, अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: 'Root' मजबूत! जो रूटचे ३८वे शतक; भारतीय गोलंदाजांची घेतली शाळा, मोडले अनेक विक्रम

Walmik Karad: ''धनंजय मुंडेंना आयुष्यातून उठवून मंत्रिपदाची शपथ घेणार होता वाल्मिक कराड'', बाळा बांगरचा रेकॉर्डिंग बॉम्ब

Pune: पुण्यातील मोठ्या धरणाच्या पाण्याला हिरवा रंग, लोकांमध्ये भीतीचं वातावरण, धक्कादायक कारण समोर

IND vs ENG 4th Test: शुभमन गिलचा मास्टरस्ट्रोक! इंग्लंडने चार षटकांत गमावल्या दोन मोठ्या विकेट्स; आता सामन्यात आली रंगत

Narendra Modi and Nehru : ‘या’ दिवशी पंतप्रधान मोदी मोडणार नेहरूंचा सर्वात मोठा विक्रम!

SCROLL FOR NEXT