पुणे

घोटावडे येथील विद्यार्थिंनीना शैक्षणिक मदत

CD

भुकूम, ता. २२ : घोटावडे, (ता. मुळशी) कुळे व खेचरे येथील विद्यालयातील गोरगरीब विद्यार्थिंनीना सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब देवकर यांनी १५ विद्यार्थिंनीना शिक्षणासाठी दत्तक घेतले. त्यांना वर्षभरासाठीचा सर्व खर्चाची रक्कम आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते देण्यात आली. तसेच त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी मांडेकर म्हणाले, ‘‘विद्यालयासाठी हॉल बांधून देण्यासाठी प्रयत्न करू. तसेच तालुक्यातील कंपन्यांना त्यांचा सीएसआर निधी शैक्षणिक विकासासाठी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विना अनुदानित शिक्षकांचे पगार देण्याबाबत सहकार्य करू. तसेच आतापर्यंत देवकर यांनी ८०० मुलींना शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य केले. हे खरे सामाजिक कार्य आहे.’’
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांताराम इंगवले, माजी उपसभापती रवींद्र कंधारे, संजय उभे, ज्ञानेश्वर साठे, राजाभाऊ शेळके, भीमाजी केसवड, संतोष गोडांबे, राम बोडके, नीलेश शेळके, योगेश गोडांबे, दीपक तापकीर, साईनाथ गोडांबे, अभिजित आमले, मुख्याध्यापक सुभाष देशमुख, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत देवकाबळे आदी उपस्थित होते. देवकर यांनी प्रास्ताविक; तर सुनील सातव यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जिल्हा बॅंकेच्या थकबाकीची ३५ नेत्यांवर १२३८ कोटींची जबाबदारी निश्चित! सुनावणीसाठी सहकारमंत्र्यांना नाही वेळ; उच्च न्यायालयाचे आदेश तरीही? माजी आमदार राऊत यांचे सहकारमंत्र्यांना पत्र

अग्रलेख : हा धक्का कुणाला?

Harmanpreet Kaur: भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इंग्लंडमध्ये रचला इतिहास!

Panchang 23 July 2025: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

आजचे राशिभविष्य - 23 जुलै 2025

SCROLL FOR NEXT