भुकूम, ता. १० ः मुळशीत पावसाने आतापर्यंत चांगली साथ दिल्यामुळे भात पीक जोमात आहे. रोपे निसवली असून, लोंब्या बाहेर पडल्या आहेत. लोंब्या भरून रोपे अंतिम टप्प्यात असून, दिवाळीपर्यंत भात काढणी सुरू होईल.
तालुक्यात यावर्षी पाऊस मे महिन्यात सुरू झाल्यामुळे भात लागवड सर्व क्षेत्रात होऊ शकली नाही. दरम्यान, लागवड झालेल्या रोपांची स्थिती चांगली आहे. सततच्या पावसामुळे काही भागात करपा रोग पडू लागला आहे. तालुक्यात दोडकी, साळ या जातीची भात रोपे काढणीस आली आहेत. प्रामुख्याने इंद्रायणी जातीच्या भाताची लागवड तालुक्यात सर्वत्र केली जाते. यापूर्वी आंबेमोहोर जातीच्या भाताची लागवड सर्वत्र होत होती. दरम्यान, उंच रोपांमुळे अधिक नुकसान होत होते. म्हणून शेतकरी इंद्रायणी भात जातींचे लागवडीकडे वळले आहेत. शेवटच्या टप्प्यात निसर्गाने चांगली साथ दिल्यास यावर्षी भाताचे चांगले उत्पन्न मिळेल ,अशी शेतकऱ्यांना आहे.
02761