भिगवण, ता. २३ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येथील हॉटेल सागरसमोर भरधाव मालट्रकने रस्ता ओलांडत असलेल्या कळस (ता.इंदापूर) येथील एकास जोरदार धडक दिली. यामुळे दिलीप निवृत्ती गायकवाड (रा. कळस, ता.इंदापूर) यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.२३) दुपारी दीडच्या सुमारास घडली.
भिगवण पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, दिलीप निवृत्ती गायकवाड हे शुक्रवारी (ता.२३) दुपारी दीडच्या सुमारास नातेवाइकाच्या विवाहानिमित्त निघाले होते. येथील हॉटेल समोरून महामार्ग ओलांडत असताना पुणे बाजूकडून सोलापूरकडे निघालेल्या भरघाव ट्रकने (क्र.एम.एच. १३ ए.एक्स ४०५९) ने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मालट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु घटनास्थळी असलेल्या राजेभोसले व इतरांनी त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मालट्रक चालक आकाश मधुकर साखरे यांचे विरुद्ध येथील भिगवण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.