भिगवण, ता. ३ : तक्रारवाडी (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव ७ विरुद्ध २ मतांनी मंजूर झाला आहे. तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सरपंचांविरुद्ध प्रथमच अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे.
तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच मनीषा प्रशांत वाघ यांच्याविरूद्ध शरद संपतराव वाघ व इतर सहा सदस्यांनी एकत्र येत २६ जून रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता. अविश्वास दाखल करत असताना ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, विकासकामे वेळेत न करणे, ग्रामस्थांना उचित वागणूक न देणे, सरपंच यांचे पती यांनी ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप करणे, ग्रामसभेत मंजूर विषयावर अंमलबजावणी न करणे आदी आरोप केले होते. गुरुवारी (ता. ३) तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये हा ठराव मांडण्यात आला. त्यावेळी ठरावाच्या बाजूने ७, तर विरोधात २, असे मतदान झाले. त्यामुळे सरपंच मनीषा वाघ यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर केल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.
याबाबत सरपंच मनीषा वाघ म्हणाल्या, ‘‘अविश्वास ठराव आणत असताना ग्रामपंचायत सदस्यांनी केलेले आरोप हे निराधार आहेत. मागील दोन वर्षे सर्व सदस्य व ग्रामस्थांना विचारात घेऊनच पारदर्शी करभार केला आहे. यापुढेही गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.