पुणे

इंदापूरचे तहसीलदार, कर्मचाऱ्यांच्या चौकशीची मागणी

CD

भिगवण, ता. १८ : इंदापूरचे तहसीलदार आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी यांच्या कार्यपद्धतीमुळे तालुक्यातील सामान्य माणसाला नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत. तहसीलदार यांचे दुर्लक्ष आणि कर्मचाऱ्यांची अर्थपूर्ण अपेक्षा यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. इंदापूरचे तहसीलदार आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी इंदापूर तालुका भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष तेजस देवकाते यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले आहे. देवकाते यांनी दिलेल्या निवेदनानुसार इंदापूरचे तहसीलदार हे केवळ स्थानिक नेत्यांचे हितसंबंध जोपासण्यात व्यग्र आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यामध्ये कायदा आणि सुविधा कायम ठेवणे, विविध प्रश्‍नांवर आंदोलकांना प्रतिसाद देणे, रस्त्याचे प्रश्‍न निकाली काढणे आदी जबाबदारी तहसीलदारांची असताना याकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच तहसिल कार्यालयांमध्ये अर्थपूर्ण व्यवहाराशिवाय सर्वसामान्य व्यक्तीची कामे होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. इंदापूरचे तहसीलदार व कार्यालयातील कर्मचारी यांच्या कार्यपद्धतीची तातडीने चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत याबाबत इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘इंदापूर तहसील कार्यालयाच्या कार्यपद्धतीबाबत अद्याप कोणत्याही नागरिकाची तक्रार प्राप्त झालेली नाही. कार्यालयांमध्ये कामानिमित्त येत असलेल्या प्रत्येक नागरिकांचे प्रश्‍न योग्य पद्धतीने हाताळले जात आहेत. तक्रारीमध्ये तथ्य नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

Pune Crime : बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून महिलांची फसवणूक; आरोपीकडून १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्टार प्रवाहची नवी मालिका 'बाई तुझा आशीर्वाद'चा प्रोमो समोर; ईशा केसकर नाही 'ही' अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका

Navi Mumbai: पोलिसांचा गुन्हेगारांना दे धक्का! अवैध कारभाराविरुद्ध १४ आरोपींवर गुन्हे दाखल; घणसोलीत धडक कारवाई

Ajit Pawar News: V.K. सिंह यांचं अंडरवर्ल्डशी संबंध, मिटकरींकडे कोणते पुरावे?

SCROLL FOR NEXT