पुणे

सरपंचनंतर उपसरपंचाविरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर

CD

भिगवण, ता. २९ : तक्रारवाडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचापाठोपाठ उपसरपंचाविरुद्धचा अविश्वास ठरावही मंजूर झाला आहे. याबाबतची माहिती इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली. तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या इतिसाहासांमध्ये प्रथमच सरपंच व उपसरपंच या दोघांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.
सरपंच मनीषा वाघ यांच्याविरुद्ध जून महिन्यात हा ठराव मंजूर झाला. त्यानंतर शरद वाघ व इतर सहा ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंच आशा जगताप यांच्याविरुद्धही अविश्वास ठराव दाखल केला होता. इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २८) तक्रारवाडी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली. यात सात सदस्यांनी ठरावाच्या बाजूने, तर एकाने विरोधात मतदान केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपसरपंच जगताप अनुपस्थित होत्या. त्यांच्याविरुद्धचा हा ठराव सातविरुद्ध एक मताने मंजूर झाल्याचे तहसीलदार बनसोडे यांनी जाहीर केले. सरपंच व उपसरपंच यांच्याविरुद्धचे अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे पुढील सरपंच व उपसरपंच कोण होणार याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी वाचवा! एक लीटर पाण्यात अंघोळ, RSSच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत असल्याचा VIDEO VIRAL

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Solapur Vidhansabha BJP: सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपचा सस्पेन्स कायम; उमेदवारीवरून भाजपमध्ये चुरस, कोणाला मिळणार संधी?

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

"आमिर आणि माझ्या नात्याला नाव मिळालं नाही" पूजा भट्टचा धक्कादायक खुलासा; नात्याबद्दल म्हणाली..

SCROLL FOR NEXT