भिगवण, ता. १८ ः ‘‘छत्रपती शिवाजी राजांचे कार्य हा महाराष्ट्राच्या जडणघडणीचा पाया आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्ष समाजाची निर्मिती केली. वर्तमान काळामध्ये समाजात जात, धर्मीय विद्वेषाच्या विचारांना उत्तर म्हणून शिवकार्याची स्मृती जतन करण्याची आवश्यकता आहे,’’ असे प्रतिपादन माळशिरस (जि. सोलापूर) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक व साहित्यिक हनुमंत पवार यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व येथील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहास लेखन कार्यशाळेचे ‘छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राच्या इतिहासाची जडणघडण’ या विषयावर ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. तानाजी मगर होते. कार्यक्रमासाठी डॉ. महादेव वाळुंज, प्रा. संदीप साठे, डॉ. प्रशांत चवरे, डॉ. बाळासाहेब खरात, डॉ. अनिल बनसोडे, प्रा. किरण गुणवरे उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्रा. सचिन गुळीग यांनी ‘डिजिटल आशय निर्मितीचे तंत्र’ या विषयावर, इंदापूर महाविद्यालयातील डॉ. बाळासाहेब काळे यांनी ‘इंदापूरचा स्थानिक इतिहास’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. तानाजी मगर म्हणाले, ‘‘वर्तमान काळामध्ये जगण्यासाठी इतिहास हा खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असतो. इतिहास लेखन कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये इतिहास लेखनाविषयी आवड निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतील.’’
प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सुरेंद्र शिरसट यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विनोद भुजबळ यांनी केले. तर आभार प्रा. श्याम सातर्ले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील अध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.