पुणे

भिगवणमध्ये शिवजयंतीनिमित्त प्रतिमा पुजन, व्याख्यानमाला, नृत्य स्पर्धा, होम मिनिस्टर

CD

भिगवण, ता. १९ ः भिगवण (ता. इंदापूर) व परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त प्रतिमापूजन, नृत्य स्पर्धा, व्याखानमाला आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच गुराप्पा पवार, राजकुमार हगारे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी पराग जाधव, अजिंक्य माडगे, तुषार क्षीरसागर, कपिल भाकरे, सत्यवान भोसले, डॉ. माधवराव नाईक निंबाळकर, खंडेराव गाडे, अप्पासाहेब गायकवाड उपस्थित होते. येथील स्वामी समर्थ बाल संस्कार केंद्राच्या वतीने मेघा शेलार व धनश्री गुरव यांचे मार्गदर्शनाखाली शिवराय व मावळे यांचे वेषामध्ये काढलेली मिरवणूक लक्षवेधी होती.
येथील जाणता राजा मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात साहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी गुराप्पा पवार, पराग जाधव, अजिंक्य माडगे, सचिन बोगावत, प्रशांत शेलार, प्रदीप वाकसे, बापूराव थोरात, जावेद शेख, अप्पासाहेब पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन माऊली चव्हाण, योगेश चव्हाण, संतोष भालेराव, नीलेश चव्हाण, गणेश जाधव, संतोष दाभाडे, अरुण चव्हाण यांनी केले.
येथील श्रीनाथ तरुण मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये प्रतिमापूजन मेघना बंडगर व पराग जाधव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी हेमाताई माडगे, गुराप्पा पवार, संजय देहाडे, प्रशांत शेलार, अजिंक्य माडगे, तुकाराम बंडगर उपस्थित होते.
येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. व्याख्यानमालेचे उद्‍घाटन मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. व्याख्यानमालेमध्ये हास्य कवी अशोक नायगावकर, पत्रकार विलास बडे, अभिनेत्री श्वेता शिंदे, कमांडो मधुसूदन सुर्वे यांची व्याख्याने झाली. कार्यक्रमाचे नियोजन शाखाध्यक्ष डॉ. संकेत मोरे, शहराध्यक्ष प्रशांत गायकवाड, तालुकाध्यक्ष छगन वाळके, व्याख्यानमालेचे संयोजक डॉ. जयप्रकाश खरड, विजय गायकवाड व पदाधिकाऱ्यांनी केले.
भिगवण स्टेशन येथे शिवरत्न प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीनिमित्त रात्री १२ वाजता शिवजन्म सोहळा कार्यक्रमामध्ये महिलांनी पाळणा गायन केले. सकाळी प्रतिमापूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या मेघना बंडगर, पंचायत समिती सदस्या हेमाताई माडगे, प्रमिला जाधव, पराग जाधव, अशोक शिंदे उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

1386

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT