पुणे

अपहरण नाही, स्वखुशीने गेले!

CD

भिगवण, ता. २० : येथील २१ वर्षीय तरुणीच्या अपहरण प्रकरणाला शुक्रवारी (ता. २०) नवे वळण मिळाले. अपहरण झाल्याची तक्रार दाखल झालेल्या तरुणीनेच गुरुवारी (ता. १९) मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये हजर राहून, ‘आपले अपहरण झाले नसून, सदर तरुणांसमवेत स्वखुशीने गेले आहे,’ असा खुलासा प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केला.
भिगवण (ता. इंदापूर) येथे आई आणि भावासोबत असलेल्या तरुणीचे दोन तरुणांनी तिघांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अपहरण केल्याची तक्रार
तरुणीच्या नातेवाइकांनी मंगळवारी (ता. १७) भिगवण पोलिस ठाण्यात दिली होती. या प्रकरणामुळे भिगवण व परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. तसेच, आमदार गोपीचंद पडळकर व आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा काढून अपहरण झालेल्या तरुणीला तिच्या नातेवाइकाच्या ताब्यात देण्याची व आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती.
दरम्यान, या तरुणीने बुधवारी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ पोस्ट करत, ‘आपले अपहरण झाले नसून, आपण स्वखुशीने सदर तरुणासोबत गेलो,’ असे सांगतिले. तर, गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास या प्रकरणातील तरुण व तरुणी बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. यावेळी या तरुणीने, ‘आपण स्वमर्जीने तरुणासोबत गेलो,’ असे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले. तसेच, १७ फेब्रुवारीला भाऊ व आईसमवेत भिगवण बाजारपेठेमध्ये वस्तू खरेदीसाठी जाणार असल्याची माहितीही आपण स्वतः सदर तरुणाला दिली. तसेच, ‘तू भिगवण येथील शासकीय विश्रामगृहामागे ये, तेथून आपण आई व भावाची नजर चुकवून निघून जावू,’ असा फोन त्याला केल्याचे सांगतले. ‘त्याप्रमाणे या तरुणांसोबत आपण स्वखुशीने निघून गेले. त्यावेळी आई किंवा भाऊ यांच्यावर कोणताही हल्ला किंवा मिरची पुड टाकली नाही,’ असेही तिने सांगितले.

या प्रकरणातील तरुण व तरुणी गुरुवारी (ता. १९) मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिसांत हजर झाले आहेत. नातेवाइकांकडून करण्यात आलेली तक्रार, तसेच मुलीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये तफावत आहेत. सदर तरुणीस न्यायालयात हजर केले असून, न्यायालयासमोरही तरुणीचा जबाब घेतला आहे. पोलिस प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.
- संदीपसिंग गिल, जिल्हा पोलिस अधिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT