पुणे

पोलिस पाटील गावात राहत नसल्याने पोलिस त्रस्त

CD

भोर, ता. २७ ः तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमधील पोलिस पाटील हे गावात न राहता भोर, पुणे किंवा इतर ठिकाणी राहू लागले आहेत. त्यामुळे पोलिसांचा त्रास वाढला असून गुन्ह्यांची व प्रशासनाला इतर अत्यावश्यक गोष्टींची माहिती मिळण्यास विलंब होत आहे. याशिवाय गावातील वाद-विवाद होण्याच्या संख्येत आणि अवैध धंद्यांमध्ये वाढ होत आहे. सध्या तालुक्यातील गावांच्या यात्रा सुरु आहेत. त्यानिमित्त गावातील बैठका, फंड, यात्रेची वर्गणी व कार्यक्रमांमधून वाद होण्याची चिन्हे असतात. परंतु, तरीही काही पोलिस पाटील अद्यापही गावाकडे फिरकले नाहीत. तर काही पोलिस पाटील आपल्या व्यवसायात दंग आहेत.
गावात एखादी दुर्घटना किंवा गुन्हा घडल्यास पोलिस पाटलांनी पोलिसांना खबर देणे आवश्यक असते. परंतु, अनेक वेळा पोलिसांनाच पोलिस पाटलांना फोन करून खबर द्यायला या म्हणून सांगावे लागते. गावातील प्रत्येक घटनेची माहिती पोलिस पाटलांना असायला हवी. तालुक्याच्या भोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ११८ गावांपैकी ५६ गावांमधील पोलिस पाटलांची पदे रिक्त आहेत. आणि हजर असलेल्या ६० पोलिस पाटलांपैकी निम्मे पोलिस पाटील हे गावात राहात नाहीत. मागील दोन वर्षात प्रांताधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तीन पोलिस पाटलांचे निलंबन केले आहे. याबाबत पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष अनिल डोंबे यांच्याशी संपर्क साधला असता काही पोलिस पाटील गावात राहत नाहीत. मात्र, त्यांचा गावाशी संपर्क असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पोलिस पाटलांची रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे रिक्त पदेही लवकरच भरली जातील, असे प्रांताधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

पोलिस पाटलांनी प्रशासनाच्या कामांमध्ये निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केल्याचे आणि कायद्याविरोधात वर्तन केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर त्वरित कडक कारवाई करण्यात येईल.
-राजेंद्र कचरे, प्रांताधिकारी, भोर

पोलिस पाटलांनी गावातच राहणे अपेक्षित आहे. गावातील तंटे, गावात येणाऱ्या फेरीवाल्यांची आणि अनोळखी व्यक्तींची माहिती पोलिस पाटलांनी गोळा करणे अपेक्षित आहे. याशिवाय सण व धार्मिक कार्यक्रमात गावात शांतता राखण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे बंधनकारक आहे. गावाशी संपर्क न ठेवणाऱ्या पोलिस पाटलांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येईल.
- विठ्ठल दबडे, पोलिस निरीक्षक, भोर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT