भोर, ता. ३१ : ‘‘सध्या आपले विद्यार्थी खरोखर सुरक्षीत आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांची जबाबदारी वाढलेली आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर, संस्कार आणि गुड टच बॅड टचबाबत मार्गदर्शन करावे,’’ असे मत भोरचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी व्यक्त केले.
उत्रौली (ता.भोर) येथील प्राथमिक शाळेत झालेल्या तालुकास्तरीय बालविकास व चालू घडामोडींवर गुरुवारी (ता.२९) आयोजित उद्बोधन कार्यशाळेत धनवकडे बोलत होते.
एक दिवशीय कार्यशाळेत बालहक्क सुरक्षा व जनजागृती याबाबत गटविकास अधिकारी राजकुमार बामणे, भोर पोलिस ठाण्याचे संरक्षण अधिकारी श्रीमती एम् .जी. जाधव तसेच एन् .बी. मोरे यांनी मार्गदर्शन केले. महिला, मुली आणि लहान मुलांबाबतचे कायदे, पॉस्को कायदा, कौटुंबिक हिंसाचार आणि संरक्षण, छेडछाड विरोधी कायदा, बाललैंगिक अत्याचार आणि जागरुकता, तक्रारीची पद्धत व कार्यवाही याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, यावेळी कायदे विषयक माहिती पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यशाळेत ५० प्राथमिक शिक्षक, २४ केंद्रप्रमुख व गटसाधन केंद्र कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी प्रास्ताविक केले. मनोजकुमार पुरंदरे यांनी आभार मानले.
या कार्यशाळेत विस्तार अधिकारी विठ्ठल गुंड, तालुका गटसमन्वयक प्रभावती कोठावळे, केंद्रप्रमुख संघटना तालुकाध्यक्षा अंजना वाडकर, केंद्रप्रमुख सखाराम बलकवडे, पद्मजा नाईक, मंगल मालुसरे, सुनीता गायकवाड, साधना गायकवाड, सुषमा पाटील, अलका लोखंडे, संजय ताम्हाणे, शिवाजी जाधव, विजय थोपटे, अरविंद बढे, पोपट तांगडे, गुणवंत इंगळे, राजू पडवळ व शैला कोठावळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
04104
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.