पुणे

गुंजवणी पाणी प्रकल्पाची सुरुवात सोमुर्डी येथून करण्याची मागणी

CD

भोर, ता. ११ : राजगड तालुक्यातील गुंजवणी धरण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पुरंदर तालुक्यातील आठ गावांचा समावेश करावा. गुंजवणी पाणी प्रकल्पाची तालुक्यातील सुरुवात सोमुर्डी, गराडे व पठारवाडी गावापासून करावी, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे भाजप जिल्हा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांनी केली.

नीरा-देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील कोडुलकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. भोरमधील सांगवी-भाटघर येथील नीरा-देवघर प्रकल्पाच्या कार्यालयात
सोमवारी (ता.१०) जगदाळे यांनी निवेदन दिले. यावेळी बोपगावचे दयानंद फडतरे, भिवरीचे माजी सरपंच दिलीप कटके, थापेवारवडीचे सरपंच नीलेश जगदाळे, गराडेचे माजी उपसरपंच अमित दूरकर, गराडेचे तंटामुक्ती अध्यक्ष योगेश जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते मोहन गायकवाड व मनोज घिसरे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, पुरंदर तालुक्यात येणाऱ्या गुंजवणीच्या पाण्याचे १९९३ च्या जुन्या सर्वेक्षणानुसार काम केले तर गराडे, थापेवाडी, सोमुर्डी, वारवडी, भिवरी-पठारवाडी, आस्करवाडी, बोपगांव,चांबळी व हिवरे या गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात सोमुर्डी येथून झाल्यास पुरंदरच्या सर्व भागांमध्ये पाणी पोहचवणे सोपे व सहज शक्य होईल. याशिवाय गराडे येथे पुरंदर तालुक्यातून वाहणाऱ्या कऱ्हा नदीचा उगम असल्यामुळे पुरंदर तालुक्याच्या सर्व भागामध्ये पाणी पोहचण्यास मदत होईल. तसेच आत्ताच्या नवीन सर्वेक्षणानुसार गुंजवणीच्या बंद जलवाहिनीच्या योजनेद्वारे पाणी आणल्यास जेवढे क्षेत्र ओलिताखाली आवश्यक आहे तेवढे पाणी मिळणार नाही. यासाठी सोमुर्डी येथूल प्रकल्पाचे पाणी देण्यास सुरुवात करावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT