पुणे

भोरमध्ये कौटुंबिक हिंसाचारासंदर्भात पथनाट्यातून जनजागृती

CD

भोर, ता. १४ : भारती विद्यापीठ लॉ कॉलेज पुणे येथील विद्यार्थ्यांनी भोर शहरातील राजवाडा चौकात कौटुंबिक हिंसाचाराबाबत जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर केले. मंगळवारी (ता. ११) सकाळी दहा वाजता राजवाडा चौकातील तहसील कार्यालयासमोर झालेल्या या पथनाट्यासमवेत प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन आणि अॅड. शिवाजी मरळ यांनी मार्गदर्शन केले. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भोर तालुका विधी समिती, प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि भोर तालुका वकील संघटना भोर यांच्या वतीने या पथनाट्याचे आयोजन केले होते. रविवारी (ता. १६) सासवड (ता. पुरंदर) येथे होणाऱ्या शासकीय योजनांच्या महामेळाव्यात नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी केले.
यावेळी गटविकास अधिकारी तथा तालुका विधी सेवा समितीचे सचिव किरणकुमार धनवाडे, निवासी नायब तहसीलदार अरुण कदम, पुरवठा निरीक्षक प्रीतम गायकवाड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ॲड. तेजल आहेर, ॲड. साक्षी कोंडे, भारती विद्यापीठ लॉ कॉलेजचे प्रा. सलील शृंगापुरे व शुभम त्रिपाठी आदी उपस्थित होते.
याशिवाय मंगळवारी सकाळी येथील न्यायालयात महिला दिन साजरा केला. न्यायालयाच्या प्रमुख दिवाणी न्यायाधीश नेहा नागरगोजे यांच्या हस्ते उपस्थित महिलांचा सन्मान केला. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. संतोष बाठे, उपाध्यक्ष ॲड. शिवाजी पांगारे, दिवाणी न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक सुमेध गुजर, ॲड. विठ्ठल दुधाणे, ॲड. दीपक बोरकर, ॲड. मनीषा तारू आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT