पुणे

थोपटे महाविद्यालयाचे विद्यार्थी नौदलात

CD

भोर, ता. २५ : येथील राजगड ज्ञानपीठाच्या अनंतराव थोपटे महाविद्यालयातील महाराष्ट्र नेवल युनिट तीनच्या एनसीसी विभागातील दोन विद्यार्थ्यांची भारतीय नौदलात निवड झाली आहे. यामध्ये तृतीय वर्ष विज्ञान शाखेतील कॅडेट कॅप्टन अविष्कार मादगुडे आणि कॅडेट सुयश चव्हाण यांचा समावेश आहे.
आविष्कार याची नौदलाच्या एसएसआर टेक्निकल, एसएसआर मेडिकल व एसएसआर चीफ ब्रांचसाठी तर सुयश याची एसएसआर टेक्निकल ब्रांचसाठी निवड झाल्याची माहिती एनसीसी विभागाचे डॉ. संदीप उल्हाळकर यांनी दिली. महाविद्यालयातील एनसीसी विभागाचे विद्यार्थी पोलिस भरती, भारतीय लष्कर व इतर सुरक्षा दलांमध्ये सातत्याने यश संपादन करीत असतात. यावर्षीही हीच परंपरा विद्यार्थ्यांनी राखली असून दोन्ही कॅडेट्सनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार संग्राम थोपटे, मानद सचिव स्वरूपा थोपटे, उपाध्यक्ष पृथ्वीराज थोपटे यांनी अभिनंदन केले. प्राचार्य संजय नेवसे, उपप्राचार्य डॉ. सविता गायकवाड, लेफ्टनंट पल्लवी मळेकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission on SIR : निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय! आता संपूर्ण देशभर ‘SIR’ लागू होणार

Pune: पुण्याच्या राजकारणात मोरे घराणं नवा डाव टाकणार! वडिलांसोबत मुलगाही निवडणुकीचं मैदान गाजवणार, सूचक पोस्टनं लक्ष वेधलं

राम चरण दुसऱ्यांदा होणार बाबा, आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिली गुडन्यूज, व्हिडिओ व्हायरल

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात वाहतुकीची प्रचंड कोंडी; पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक

Eighth Pay Commission: केंद्र आठवा वेतन आयोग कधी लागू करणार? मोठी अपडेट आली समोर, सरकारची योजना काय? वाचा...

SCROLL FOR NEXT