पुणे

भोरला पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही

CD

भोर, ता. १० : नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून (ता. १०) सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्राजक्ता घोरपडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी दिली. उमेदवारांसाठी नगरपालिकेच्या सभागृहात अर्ज दाखल करण्याची सोय केली आहे. नगरपालिका इमारतीच्या १०० मीटर परिसरात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांशिवाय इतरांना प्रवेश बंद केला आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत या परिसरात इतरांना बंदी घातली आहे. नगरपालिकेतील कार्यालयीन कामकाजासाठीही नागरिकांना सकाळी १० ते ११ आणि दुपारी ३ ते ६ या वेळतच जावे लागणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यत म्हणजे सोमवारपर्यंत (ता. १७) हे निर्बंध राहणार आहेत. आठवडे बाजार हा शिवाजी पुतळा रस्ता, नवी आळी आणि मंडईच्या नवीन जागेत भरणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT