पुणे

इंगवलीतील नेकलेस पॉइंटवर पर्यटकांची मांदियाळी

CD

भोर, ता. ४ : पुणे- कापूरहोळ- भोर मार्गावरील इंगवली (ता. भोर) येथील नेकलेस पॉइंटवर पर्यटकांची आणि मांढरदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांनी रविवारी (ता. ४) मोठी गर्दी केली होती.
रविवारची सुट्टी आणि मांढरदेवीच्या यात्रेचे मुख्य दिवस सुरू असल्यामुळे भोर- पुणे मार्गावर भाविकांच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. देवदर्शन करून आल्यानंतर धरणी मातेच्या गळ्यातील हाराप्रमाणे नीरा नदीच्या पात्राचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी भाविक येथे थांबत होते. काही मद्यपी भाविकांनी आपली वाहने नेकलेस पॉइंटच्या जवळच उभी केल्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. पर्यटकांच्या वाहनांमुळे नेकलेस पॉइंटवर जाण्याचा मार्गही बंद झाला. याशिवाय काही मद्यपी पर्यटकांनी मोठ- मोठ्याने ओरडून धिंगाणाही घातला. यामुळे महिला पर्यटकांची व भाविकांची कुचंबणा झाली. मात्र, देवदर्शनाला आल्यामुळे वाद नको म्हणून अनेक महिलांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
रविवारी नेकलेस पॉइंटवर नेहमीच गर्दी असते. परंतु, आता मांढरदेवीच्या यात्रेचे दिवस असल्यामुळे रविवारी (ता. ४) नेकलेस पॉइंटवरील गर्दीत अधिकच भर पडली. याची कल्पना असूनही राजगड पोलिस ठाण्याकडून येथे बंदोबस्त ठेवण्यात आला नव्हता. तसेच, पोलिसांचे गस्त पथकही फिरकले नाही. रविवारी दुपारनंतर नेकलेस पॉइंटवरील पर्यटकांच्या गर्दीत खूप वाढ झाली. मांढरदेवीचे दर्शन घेऊन परतणारे सर्व भाविक त्या ठिकाणी थांबले होते. सायंकाळी उशिरापर्यंत नेकलेस पॉइंटवर पर्यटक रेंगाळत होते.

06283

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT