पुणे

कांबरे येथील सई सुकाळे हिची लेफ्टनंट पदी झेप

CD

भोर, ता. ८ ः तालुक्याच्या भाटघर धरण खोऱ्यातील कांबरे बुद्रुक येथील सई समीर सुकाळे हिची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट (श्रेणी एक) म्हणून निवड झाली. आई-वडिलांच्या पाठबळाच्या जोरावर जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांनी तिने हे यश मिळवले असून सुकाळे कुटुंबीयांसह भोर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सईचे आजोबा (आईचे वडिल) यांची सैन्यदलात भरती होण्याची संधी हुकली परंतु आपल्या घरातील एकतरी सैन्यदलात असावा ही त्यांची शेवटची इच्छा होती. ती इच्छा त्यांची नात सई हिने पूर्ण करून दाखवली.
सईचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नवी मुंबई येथे आणि कला शाखेच्या पदवीचे शिक्षण पुण्यातील कावेरी महाविद्यालयातून झाले. तिने स्पर्धा परीक्षेतून चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमीमध्ये प्रवेश मिळवला आणि एक वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर तिची भारतीय सैन्यात लेफ्टनंट-वर्ग एक पदी नियुक्ती झाली.
प्रशिक्षण काळात तिने वैयक्तिक केवळ शिस्त आणि धैर्यच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही आपली छाप उमटवली. प्रशिक्षण काळातील स्पर्धांमध्ये तिने २ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य पदकांबरोबर ड्रील बेज आणि मार्क्समन बेज स्पर्धा जिंकल्या. याशिवाय तिच्याकडील व्यक्तिमत्व, नेतृत्वगुण आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिने मिस ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी हा मानाचा किताबही पटकावला.
आई सुवर्णा आणि वडील समीर सुकाळे यांनी दिलेला स्वातंत्र्यपूर्ण आणि प्रोत्साहनाचा आधार हे सईच्या प्रवासातील सर्वात मोठे आधारस्तंभ ठरले. सईने वयाच्या पाचव्या वर्षापासून स्विमिंगला सुरुवात केली. पोहण्यात ती एवढी पारंगत झाली की वयाच्या तेराव्या वर्षी तिची लॉन्ग डिस्टन्स स्विमिंग प्रकारात लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. तिने दक्षिण आफ्रीकेमधील केपटाऊन येथेही लॉन्ग डिस्टन्स स्विमिंगमध्ये विक्रम प्रस्थापित केला.
महाविद्यालयीन काळात वॉटर पोलो प्रकारात राष्ट्रीय स्तरावर दोन वेळा सुवर्ण आणि रौप्य पदके पटकावली. महाविद्यालयीन काळात तिने दिल्ली येथील २६ जानेवारीच्या रिपब्लिक डे परेडमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली. अभ्यासासोबत डिबेट स्पर्धा, नाटकांमध्ये सहभाग, स्कायलार्क स्पोर्टस अकॅडमीमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काम, बॉक्सिंगचा सराव तसेच सीडीएसईसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या सर्वांमुळे तिचे व्यक्तिमत्त्व सर्वांगीण घडले. नोव्हेंबर २०२५मध्ये स्पर्धा परीक्षेत तिने एसएसबी मुलाखत, मानसिक व शारीरिक चाचण्या तसेच मेडिकल टेस्ट या सर्व टप्प्यांत उल्लेखनीय यश मिळवले आणि उत्कृष्ट गुणांसह अधिकारीपद मिळवले. शनिवारी (ता. ७) चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमीमध्ये पासिंग आउट परेड पार पडली. त्यामध्ये सईच्या आई-वडिलांचा गौरव करण्यात आला.

‘‘माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर विश्वास टाकून मला बळ दिल्यामुळेच मला हे यश मिळाले आहे. तरुण-तरुणींनी परिश्रम करा, सातत्य ठेवा, स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि देशसेवेची भावना जपून प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास कोणतेही यश अवघड नाही.’’
-सई सुकाळे, लेफ्टनंट

‘‘देशासाठी जगणे आणि देशासाठी लढणे या ध्येयाने प्रेरित झालेली माझी मुलगी सई हिचा मला अभिमान आहे. साहस, शौर्य, अथक मेहनत, शिस्त आणि देशसेवेची पराकाष्ठा काय असते याची प्रचिती मला तिच्या पासिंग आउट परेडमध्ये आली. आम्हा पालकांना ‘मेरी संतान देश को समर्पित’ असे लिहिलेले मेडल देण्यात आले. आमच्यासाठी हा क्षण अत्यंत भावुक करणारा होता.
-सुवर्णा सुकाळे, सईची आई.


चेन्नई ः पासिंग आउट परेडनंतर सईसोबत आनंद व्यक्त करताना आई सुवर्णा व वडील समीर सुकाळे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

SCROLL FOR NEXT