भोर, ता. ११ : पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने आशा दिनानिमित्त तालुक्यातील गुणवंत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना आदर्श आशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने येथील पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी (ता. ११) सकाळी या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती मनिषा कंक, उपसभापती विशाल कोंडे आणि जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे यांच्याहस्ते या पुरस्कारांचे वितरण केले. यावेळी पंचायत समिती सदस्या सुषमा चव्हाण, गिता आंबवले, सदस्य राजेश बोडके, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय तिडके, ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर आदींसह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातील नऊ आशा सेविका आणि एक गटप्रवर्तक यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविले.
तालुका संरक्षण अधिकारी मनिषा जाधव व चाइल्ड हेप्लपाईनचे सतीश म्हस्के यांनी आशा सेविकांना मार्गदर्शन केले. पांडुरंग शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
पंचायत समितीच्या हिर्डोशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गटप्रवर्तक सोनाली खाटपे यांना सर्वोत्तम गटप्रवर्तक पुरस्कार देण्यात आला. तालुक्यातील आशा स्वयंसेविका पुरस्काराने गौरविलेल्या आशा पुढीलप्रमाणे कंसात गावाचे नाव : हर्षा ढमाळ (टिटेघर), माधुरी ढवळे (कारी), वर्षा सुर्वे (भोंगवली), प्रतिभा साळुंके (सावरदरे), शारदा चौबे (नऱ्हे), सुरेखा गिरीगोसावी (वेळू), आशा पांगुळ (वेळवंड), रत्ना किंद्रे (हिर्डोशी), माधुरी चौधरी (कांबरे खुर्द).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.