पुणे

बारामती शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

CD

बारामती, ता. २२ : पोलिस कंट्रोल रूमला केलेल्या तक्रारीमुळे तसेच पोलिस यंत्रणेचा गैरवापर केल्याचे सांगत ३,१५० रुपयांची लाच मागितली. यातील तीन हजार रुपये स्वीकारताना संतोष जगन्नाथ पवार (वय ३९, नेमणूक-बारामती शहर पोलिस ठाणे) या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

शुक्रवारी (ता.२१) ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील तक्रारदाराने पोलिस कंट्रोल रूमला तक्रार केली होती. तसेच त्या तक्रारीचा फाॅलोअप घेण्यात आला. त्यामुळे पवार यांनी त्या तक्रारदाराला तुम्ही पोलिस यंत्रणेचा गैरवापर केल्याचे सांगितले. त्या पोटी त्यांच्याकडे लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ३ हजार रुपये घेताना पवार यांच्यावर कारवाई करण्यात आली. एसीबीचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, उपअधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर व पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच इंधनाचे नवे दर! मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल कितीला?

Hockey World Cup : भारत-अर्जेंटिनामध्ये आज लढत रंगणार; हरमनच्या सेनेचा दुसऱ्या फेरीतील अखेरचा सामना

Akola Online Vehicle Fraud: वाहन विक्रीच्या आमिषाने ९.९० लाखांची फसवणूक: नागपुरातून आरोपी जेरबंद; फसवणुकीतील एक लाख गोठविले

Marathi News Live Updates : घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात कचऱ्यावर उभं राहून मनसेचं आंदोलन

Palghar News: 'हे पुस्तक वाचाल तर आजार, समस्या दूर होतील', १८ वर्षीय तरुणावर धर्मांतराचा प्रयत्न; २२ महिलांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT