पुणे

बारामतीत कुत्र्यांच्या हल्ल्यात साडेतीन वर्षांचे बालक जखमी

CD

बारामती, ता. १६ : शहरातील खत्री इस्टेटमध्ये साडेतीन वर्षांच्या बाळावर आज भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत त्याला जखमी केले. महिनाभरात त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा लहान बाळावर कुत्र्यांनी हल्ला करण्याचा प्रकार घडल्याने स्थानिक नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.
युवान केदार जाचक (वय साडेतीन वर्षे, रा. खत्री इस्टेट, कॅनॉल रोड, बारामती) हा मंगळवारी (ता. १६) दुपारी आपल्या घराच्या दारात खेळत होता. त्यावेळी चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी अचानकच त्याच्यावर हल्ला करून त्याच्या हातापायांना जोरदार चावा घेतला. काही क्षणातच स्थानिक नागरिक विशाल आगवणे, तसेच त्याचे पालक धावून आल्याने कुत्री पळून गेली. मात्र, यात युवान कमालीचा घाबरला होता.
त्याला तातडीने डॉ. सौरभ मुथा यांच्याकडे पुढील उपचारासाठी पालकांनी नेले. दरम्यान त्याची प्रकृती स्थिर असून, त्याला काही इंजेक्शन्स द्यावी लागतील, अशी माहिती डॉ. सौरभ मुथा यांनी दिली.
दरम्यान, गेल्याच महिन्यात आश्वी जगदाळे या मुलीला भटक्या कुत्र्यांनी वीस ठिकाणी चावे घेत जखमी केले होते. ते प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा त्याच ठिकाणी युवान जाचक याला भटक्या कुत्र्यांनी जखमी केल्यानंतर आता लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बारामती नगरपालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, याबाबत ठोस उपाययोजना करावी, अशी बारामतीकरांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

SCROLL FOR NEXT