पुणे

बारामतीतील अवैध धंद्यावर कारवाईची मोहीम

CD

बारामती, ता. २४ : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामती तालुक्यात सुरु असलेल्या अवैध दारुविक्रीबाबत खास आपल्या शैलीत जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूनिर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या आदेशानुसार उपअधीक्षक एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तानाजी शिंदे, आर. डी. भोसले, बी. बी. नेवसे, राजेंद्र झोळ, संजय दिंडे, वर्षा घोडे, गणेश नागरगोजे यांच्यासह पथकातील इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने छापासत्र केले.
माळेगाव, लकडेवस्ती, सांगवी, पाहुणेवाडी, मेखळी, सोनगाव परिसरातील अवैध दारुविक्रेत्यांवर जोरदार कारवाई केली गेली. या प्रकरणी दहा गुन्ह्यांची नोंद केली असून, सहा जणांना अटक केली आहे; तर तीन आरोपींचा शोध सुरु आहे. या कारवाईत जवळपास सव्वालाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास निरिक्षक तानाजी शिंदे करीत आहेत.
दरम्यान, पोलिस विभागाच्या वतीने बारामती उपविभागात एप्रिल अखेरपर्यंत बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, वालचंदनगर, इंदापूर, भिगवण व माळेगाव या पोलिस ठाण्याअंतर्गत दारूबंदीचे २२५ गुन्हे दाखल झालेले असून, यात २४५ आरोपींवर कारवाई केली आहे. त्यात जवळपास साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी दिली.

नियमित कारवाईसाठी पथकांची गरज
अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नियमित तपासणी, गस्त, अचानक धाडी घालणे या उपायानंतरच हे अवैध व्यवसाय बंद होऊ शकतील, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT