pune pulse polio vaccination today
pune pulse polio vaccination today Sakal
पुणे

Pune News : पुणे जिल्ह्यात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

सकाळ वृत्तसेवा

Pune News : पुणे जिल्ह्यात येत्या रविवारी (ता.३ मार्च ) पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शून्य ते ५ वर्षे या वयोगटातील बालकांना पोलिओ डोस दिले जाणार आहेत.

याआधीही अनेक वर्षे जिल्ह्यात दरवर्षी पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत असे. मात्र भारत पोलिओमुक्त झाल्यानंतर ही मोहीम बंद करण्यात आली होती. आजही भारत देश पोलिओ मुक्त आहे. मात्र जगातील काही देशांमध्ये पोलीओ अजूनही कायम आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील सर्व पात्र बालकांना ही लस देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामस्थांनी आपल्या बालकांना पोलिओ डोस अवश्य द्यावा, असे आवाहन रमेश चव्हाण यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या सभा झाली . या सभेत बोलताना चव्हाण यांनी हे आवाहन केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील कोणतेही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून ही मोहिम १०० टक्के यशस्वी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गाव व पाड्यावर आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यासह ४०५ आरोग्य पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई यांनी सांगितले.

पाच लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोस

या मोहिमेमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शून्य ते ५ वर्ष वयोगटातील ४ लाख ९८ हजार ७९८ व शहरी भागातील ७७ हजार ६४९ अशा एकूण ५ लाख ७६ हजार ४४७ बालकांना पल्स पोलिओचा डोस दिला जाणार आहे. स्थलांतरित कुटुंबे, ऊसतोड व बांधकाम कामगार यांचा शोध घेऊन या कामगारांच्या सर्व पात्र बालकांना प्रत्यक्ष भेट देऊन हा पोलिओ डोस देण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT