पुणे

माळेगावात बेकायदेशीर ड्रोन उडविणारे ताब्यात

CD

माळेगाव, ता. २ ः माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) परिसरात बेकायदेशीर ड्रोन उडविलेप्रकरणी माळेगाव पोलिसांनी अल्पवयीन मुलासह दोघांविरुद्ध मंगळवारी (ता.२) कारवाई केली. या कारवाईत सूरज मानसिंग भोईटे (वय २९, रा. माळेगाव, भोसलेवस्ती) व एक अल्पवयीन संशयित आरोपीचा समावेश आहे. विशेषतः या कारवाईबरोबरच पोलिसांनी वरील संशयितांकडून एक हजार रुपये किमतीचा एक काळ्या रंगाचा ड्रोन जप्त केला.
सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास साळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यात रात्री उशिरापर्यंत ड्रोन उडविणे, चोर आल्याची अफवा पसरवून भीती निर्माण करण्याच्या घटना घडल्या आहेत. ‘मेड इन चायना’ असे नाव या ड्रोनवर आहे. या समस्यांनी गावकरी हैराण झाले होते. त्या संबंधी अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांकडे पोलिस लक्ष ठेवून असतानाच मंगळवारी माळेगाव येथे बेकायदेशीर ड्रोन उडविणारे दोघांची माहिती मिळाली. त्यानुसार जिल्हाधिकारी (पुणे ग्रामीण) आदेशान्वये परवानगीविना ड्रोन उडविण्यास मनाई असलेल्या आदेशाचे अवमान करणे, विनापरवानगी ड्रोन उडविणे आदी कलमान्वये माळेगावात दोघांविरुद्ध पोलिस कारवाई झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar MP Accident : खासदार हेमंत सावरा भीषण अपघातातून थोडक्यात बचावले, डंपरने गाडीला धडक दिली अन्...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र देशात अव्वल!

Gold Silver Rates : सोने दरात किरकोळ तर चांदीच्या दरात सलग तीन दिवस मोठी घसरण; आजचा भाव किती?

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे रेट जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा दर ?

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक वादातून तरुणाचा जीव घेतला ; तीन आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT