बारामती, ता. २७ ः शहरातील असंख्य पथदिवे बंद अवस्थेत आहेत, सकाळी लवकर पथदिवे बंद केले जातात तर, रात्री अंधार पडल्यावरही पथदिवे सुरू होत नाहीत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासनाकडून याची दखल घेत जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
या संदर्भात माहिती घेतली, तेव्हा नगरपालिका हद्दीतील तब्बल अकरा हजार पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती केवळ चार वायरमन करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. शहराचे चार विभाग करून अकरा हजार पथदिव्यांची जबाबादारी या चौघांवर दिली आहे. इतक्या प्रचंड पथदिव्यांसाठी अवघे चार कर्मचारी काय करणार या वरूनच या विषयाची मर्यादा स्पष्ट होते. नगरपालिकेने एका कंपनीशी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर देखभाल दुरुस्ती व बचतीप्रमाणे पैसे अदा करण्याबाबतचा करार केलेला आहे.
संबंधित कंपनीकडून जुने पथदिवे बदलून त्या जागी एलईडीचे दिवे बसविणे व वीजबिलाच्या बचतीच्या अनुषंगाने त्यांना रक्कम अदा करणे, असे या कराराचे स्वरूप आहे. यातही केबल व इतर काही दोष निर्माण झाला तर, तो नगरपालिकेने दुरुस्त करायचा आहे.
- सिध्दार्थ मोरे, प्रमुख, विद्युत विभाग, नगरपालिका
मनुष्यबळच नाही
शहरातील असंख्य पथदिवे बंद आहेत, काही खांबांवरील दिवे बंद अवस्थेत आहेत. काही सातत्याने लुकलुकतात, अनेक ठिकाणी अंधारातूनच लोकांना मार्गक्रमण करावे लागते. बारामतीकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत हा विषय असून त्याकडे नगरपालिकेचे प्रशासक फारशा गांभीर्याने पाहतच नाही, अशी स्थिती आहे. तक्रार आली तरच दुरुस्ती करायची अन्यथा त्याकडे पाहायला मनुष्यबळच नाही, अशी नगरपालिका प्रशासनाची अवस्था आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.