पुणे

अजित पवारांना ३८६ पैकी ३८३ बूथवर आघाडी

CD

बारामती, ता. २४ ः विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीची लढत अटीतटीची होईल, असे चित्र रंगविले गेले होते. प्रत्यक्षात अतिशय एकतर्फी अशीच ही लढत झाली. या लढतीमध्ये अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचा लाखाच्या मताधिक्याने पराभव करत बारामतीवर आपलेच वर्चस्व असल्याचे आठव्यांदा सिद्ध केले.

राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पाठिंबा नसताना किंबहुना विरोध असताना अजित पवार यांनी स्वबळावर लढत लोकांमध्ये जाऊन विकासाची ग्वाही देत विजयश्री खेचून आणली. बारामतीत विधानसभेला सहानुभूती नव्हे तर परिपूर्ण विकासाचा मुद्दाच महत्वाचा असल्याचे मतदारांनी मतपेटीतून दाखवून दिले.

बारामती मतदारसंघातील ३८६ बूथपैकी बूथ क्रमांक १५ (खराडेवाडी), २०० (मुढाळे) व २१२ (ढाकाळे) या तीन बूथवर फक्त युगेंद्र पवारांना जास्त मते मिळाली. उर्वरित ३८३ बूथवर अजित पवार आघाडीवर आहेत. या प्रक्रियेत २३८ मते बाद झाली तर ७७९ मते नोटाला मिळाली. अजित पवार व युगेंद्र पवार वगळता उर्वरित २१ उमेदवारांना मिळून ११,७५१ मते प्राप्त झाली आहेत. या सर्व २१ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या.

आठव्यांदा विजय
अजित पवार बारामतीतून आठव्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहे. यंदा प्रथमच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने त्यांच्या लढतीकडे अवघ्या देशाचे लक्ष होते, मात्र गांभीर्याने निवडणूक लढवीत अजित पवार यांनी बारामतीकरांना आवाहन करीत विजय खेचून आणला. प्रचाराच्या प्रारंभी अजित पवार भावुक झाले, शरद पवार यांनी त्यांची नक्कल केली, नंतर मात्र शरद पवार यांच्या पाडा, पाडा, पाडा या शब्दाचा जबरदस्त इमपॅक्ट झाला. बारामतीत शरद पवार यांनी अजित पवारांवर टोकाची टीका काही केली नाही, त्याचा अप्रत्यक्ष लाभच अजित पवार यांना झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संकटात धावून आला ‘लालबागचा राजा’! भुलेश्वरचा राजा मंडळाला ११ लाख, तर मृतांच्या कुटुंबीयांनासाठीही आर्थिक मदत जाहीर

IND vs SL 2nd Test: यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडो वादाचा नवा खळबळजनक Video समोर! ICC वर गंभीर आरोप... नेमकी 'ढुशी' मारली कोणी?

प्राजक्ता माळीला 'फरसाण'वरून का चिडवलं जातं? अभिनेत्याने सांगितला हास्यजत्रेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा

Marathi News Live Updates : शासकीय शाळांच्या मूलभूत सुविधांसाठी CJP शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची घेतली भेट

leopard spotted in Satave Kolhapur : आरळे-शहापूर रस्त्यावर दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर; तरुणांनी कॅमेऱ्यात कैद केला थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT