पुणे

पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बारामतीत पतीविरुद्ध गुन्हा

CD

बारामती, ता. ७ : विवाहीत मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी जगदीश मुरलीधर राठोड (रा. देसाई इस्टेट, बारामती) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मृत्यूमुखी पडलेली मुलगी सोनाली जगदीश राठोड हिचे वडील रमेश हिरा चव्हाण (रा. भारंबतांडा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
सोनाली हिचे जगदीश यांच्यासोबत २ एप्रिल २०१६ मध्ये लग्न झाले होते. काही काळ गेल्यानंतर सोनाली यांनी वडीलांना पती दारू पिऊन मारहाण करत पैशांची मागणी करत असल्याचे सांगितले होते, मात्र त्या वेळेस वडिलांनी मुलीस समजून सांगितले. जगदीश यांची बारामतीला बदली झाल्याने ते सोनाली यांच्यासह बारामतीत वास्तव्यास आले.
२३ नोव्हेंबर २०२४ ला सोनाली हरविल्याचे समजल्यानंतर रमेश चव्हाण बारामतीत आले होते, मात्र गुरुवारी (ता. ५) सोनालीचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी त्यांना कळविले. त्यानंतर त्यांनी पोलिसात जात जगदीश राठोड याने आपल्या मुलीचा शारीरिक, मानसिक छळ करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT