पुणे

मंगळसूत्र हिसकवण्याचे बारामतीत वाढले प्रकार

CD

बारामती, ता. १२ : शहरात चार दिवसांच्या अंतराने दोन सोनसाखळी हिसकण्याचे प्रकार घडले.
बारामती शहरात बुधवारी (ता. १२) सकाळी पावणेआठच्या सुमारास चालण्यासाठी बाहेर पडलेल्या विजया श्रीनिवास प्रभुणे (वय ५१, रा. अनुज अपार्टमेंट, हरिकृपानगर) यांच्या गळ्यातील सतरा ग्रॅम वजनाचे अंदाजे दीड लाखांचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र दोन चोरट्यांनी हिसकावून नेले. खलाटे हॉस्पिटलसमोर हा प्रकार घडला. रविवारी (ता. ९) संध्याकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या मंगला जयप्रकाश किर्वे (वय ७०, रा. टीसी कॉलेज रोड, बारामती) यांच्या गळ्यातील एक लाख तीस हजारांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले. या दोन्ही प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरु केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड व पोलिस निरिक्षक विलास नाळे यांनी दिली.
बारामतीत गेल्या वर्षभरात झालेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनेपैकी एकही चोरी उघडकीस आली नसल्याने बारामतीकरांमध्ये अधिक चिंतेचे वातावरण आहे. महिलांनी घराबाहेर पडताना पुरेशी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT