पुणे

पैशासाठी सोकावलेल्या अधिकाऱ्यांना सरळ करणार

CD

बारामती, ता. २८ : ‘‘सातव्या वेतन आयोगाचा पगार मिळतो आहे, आता आठवा वेतन आयोगही दिला जाईल, सर्व आवश्यक सुविधा दिल्या जातात, असे असतानाही बारामतीत सरकारी अधिकारी व कर्मचारी कामासाठी पैशांची मागणी करतात, हे सोकावले असून, हे प्रकार खपवून घेणार नाही, त्याचा बंदोबस्तच करतो,’’ असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
बारामतीतील एका कार्यक्रमात शुक्रवारी (ता. २८) अजित पवार यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले, ‘‘एका कार्यकर्त्याने निवेदन देत सांगितले की, एक नोंद लावण्यासाठी पंधरा हजारांची मागणी केली गेली. काय सुरु आहे बारामतीत? पगार व सुविधा पुरत नाहीत का? संबंधिताला संध्याकाळी बोलावून घेतले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड तुम्हीही संध्याकाळी या त्याच्याकडे चौकशी करू. कुणीही कुणाच्याही वशिल्याने बारामतीत आला असेल तरी मी हे खपवून घेणार नाही. यात लक्ष घालून त्यांना सरळ केल्याशिवाय आता गत्यंतर नाही.’’

‘कंत्राटदार पुढारी नकोत’
‘‘विकासकामे करताना बारामतीकरांनीही आपली नैतिक जबाबदारी लक्षात घेत व्यवस्थित राहायला हवे. कार्यकर्तेही काम निघाले की कंत्राट मागतात, या पुढील ज्यांना कंत्राटदार व्हायचे आहे त्यांनी पुढारी व्हायचे नाही व पुढाऱ्यांनी कामे करायची नाही,’’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandoli National Park : चांदोली जंगलात वाघांचे अस्तित्व वाढले; गवे, डुकरं बदलताहेत अधिवास, वनविभाग कोणतं पाऊल उचलणार?

Babar Azam घरगुती वाघ! PSL मध्ये शतक झळकावून केली विराट कोहली, अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी; रोहितला मागे सोडले

Mumbai News: वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! ‘वन नेशन, वन ई-चालान’ महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड

कुर्डुवाडीच्या प्रियांतिकाची सिनेसृष्टीत दमदार एंट्री! ‘फुला’ चित्रपटातून मांडली मुरळीच्या जगण्याची वेदना; चित्रपटाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर अमर देवकर बार्शीचे, वाचा...

ICSE and ISC Result : ‘आयसीएसई’चा ९९.१८ टक्के, तर ‘आयएससी’चा ९९.१३ टक्के निकाल; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT