बारामती, ता. ११ : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील दंतचिकित्सा विभागासाठी डिजिटल डेंटल लॅबसाठी राज्य शासनाने १ कोटी ८० लाख रुपयांच्या यंत्र व साधनसामग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.
याबाबतचा अध्याधेश नुकताच वैद्यकीय शिक्षण विभागाने जारी केला आहे. या साधनसामग्रीमुळे या रुग्णालयात रुग्णांना दंतविषयक तपासण्या व उपचारांसाठी महत्त्वाची मदत होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामार्फत डिजिटल डेंटल लॅब उपलब्ध करून दिल्याने बारामतीतील रुग्णांना त्याचा चांगला फायदा होणार आहे.
दरम्यान, बारामतीच्या महाविद्यालय व रुग्णालयासाठी १३३ सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीचाही आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने जारी केला आहे. बारामतीसह जळगाव व नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनुक्रमे १२९ व ३९ सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीस हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळाच्या वतीने ही भरती केली जाणार आहे. या साठी पाच कोटी १७ लाखांच्या आर्थिक तरतुदीसही मान्यता प्रदान केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह, मौल्यवान साहित्य व इतर सामग्री यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्थेची मागणी केली जात होती. तीन पाळ्यांमध्ये ही यंत्रणा चोवीस तास कार्यरत असेल.
या रुग्णालयात अस्थिव्यंगोपचारशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, नेत्रशल्यचिकीत्साशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, औषधशास्त्र, बालरोगचिकीत्साशास्त्र या सहा विषयांसाठी प्राध्यापकांचीही नियुक्ती शासनाने केली आहे. या मनुष्यबळाचा मुद्दा काही प्रमाणात कमी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.