पुणे

करिअरची दिशा ठरवण्याची संधी

CD

बारामती, ता. १६ : इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा संपली की विद्यार्थी व पालकांना वेध लागतात ते महाविद्यालयीन शिक्षण व पुढील करिअरची दिशा ठरवण्याचे. आयुष्याच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर सकाळ माध्यम समूहाने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२५’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. बारामतीत सुर्यनगरी येथील मुक्ताई लॉन्स येथे ३० मे व ३१ मे असे दोन दिवस हे प्रदर्शन होणार आहे.
अनेकदा विद्यार्थी व पालकांना नेमके कोणते महाविद्यालय निवडायचे किंवा कोणत्या करिअरची निवड करायची याबाबत निर्णय घेताना त्यांचा गोंधळ उडतो किंवा त्यांना पुरेसे मार्गदर्शन मिळत नाही. या प्रसंगी गरज असते ती ठरविलेल्या करिअरबाबत योग्य मार्गदर्शन व माहिती मिळण्याची. तसेच, एक योग्य दिशा देणाऱ्या एका मार्गदर्शकाची. त्यासाठी ‘सकाळ’ने या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२५’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. बारामती व पंचक्रोशीतील विविध नामांकित शिक्षण संस्थांना या प्रदर्शनामध्ये सहभागी होता येणार आहे. या प्रदर्शनात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित होणार आहेत.

कोण बुकींग करू शकते
• कनिष्ठ महाविद्यालय,
• कोचिंग क्लासेस,
• व्यावसायिक क्लासेस
• यूजी तसेच पीजी अभ्यासक्रमांसाठीचे क्लासेस

एकाच छताखाली सर्व माहिती
महाविद्यालयांसह इतर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळविण्यासह दहावी बारावीनंतर शिक्षणाच्या उपलब्ध असलेल्या विविध दालनाची, तसेच पर्यायांची माहिती, याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझाईनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती व तंत्रज्ञान यासह अन्य अभ्यासक्रमांच्या माहितीचे प्रदर्शन यात असेल. यासोबतच जेईई, नीट, सीईटी यासह अन्य स्पर्धा परीक्षाबाबतही मार्गदर्शन करणाऱ्या शैक्षणिक संस्था यात सहभागी होऊ शकतात. परदेशी शिक्षणाच्या उपलब्ध असलेल्या संधींबाबतही या प्रदर्शनादरम्यान मार्गदर्शन होऊ शकेल. शैक्षणिक कर्जाबाबतही काही बँका यात माहिती देतील.

स्टॉल बुकिंगसाठी संपर्क- दत्तात्रेय- ८९७५६ ७३३१०, रमेश- ८२०८५ ३९९४२.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVMवर झालेलं मतदान, थेट सर्वोच्च न्यायालयात मशिन्स आणून फेरमतमोजणी; निकालच बदलला

India first Independence Day: जवाहरलाल नेहरूंचे १९४७ मध्ये पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे भाषण Tryst with Destiny, काय म्हणाले होते?

Panchang 14 August 2025: आजच्या दिवशी दत्तात्रेय सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे

Pune News : पुणे शिक्षक बदली प्रक्रिया पत्रव्यवहारात अडकली; दिव्यांग प्रमाणपत्र फेरतपासणी रखडली

Latest Marathi News Updates : मुंबईत मध्यरात्रीपासून पाऊस, येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT