पुणे

बारामतीकरांसाठी प्रशांत दामलेंच्या नाटकाची मेजवानी

CD

बारामती, ता. २४ : नाट्यचळवळ अधिक वृद्धिंगत व्हावी, ग्रामीण भागातील रसिकांना दर्जेदार नाटक पाहता यावे, या उद्देशाने बारामतीत सकाळ माध्यम समूहाच्या वतीने मुख्य प्रायोजक समर्थ आयकॉनचा उपक्रम सेव्हन स्टार आयकॉन, सहयोगी प्रायोजक रजवाडी मसाले व चंदुकाका सराफ यांच्या सहकार्याने प्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांची मुख्य भूमिका असलेले शिकायला गेलो एक हे नर्मविनोदी नाटक सादर होणार आहे. सकाळ नाट्यमहोत्सवाअंतर्गत बारामतीत प्रथमच नाटक रसिकांसमोर येणार आहे.

५ जून रोजी संध्याकाळी सहा वाजता विद्यानगरीतील गदिमा सभागृहात शिकायला गेलो एक हे नाटक सादर केले जाणार आहे. प्रशांत दामले यांच्यासह ऋषीकेश शेलार, सुशील इनामदार, अनघा भगरे, चिन्मय माहुरकर, समृद्धी मोहरीर हे कलाकार या नाटकामध्ये अभिनय करणार आहेत.
अनेक रसिक बारामतीतून पुण्याला नाटक पाहण्यासाठी जातात. रसिकांना बारामतीतच दर्जेदार अभिनय असलेल्या नाट्यकलाकृती प्रत्यक्षपणे अनुभवता याव्यात, या उद्देशाने सकाळ माध्यम समूहाने नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत बारामतीत प्रशांत दामले यांचे सांस्कृतिक चळवळ अधिक वृद्धिंगत होण्यासाठी अनेक संस्था व संघटना आपले योगदान देत आहेत. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने देखील आता या चळवळीमध्ये सहभाग नोंदविला जाणार आहे. दैनंदिन ताणतणाव दूर व्हावा चार क्षण विरंगुळा मिळावा व सुट्टीचा सदुपयोग व्हावा या उद्देशाने सकाळ माध्यम समूहाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
या नाटकाबाबत अधिक माहिती व तिकिटासाठी दत्तात्रेय मारकड ८९७५६७३३१०, रमेश शिंदे ८२०८५३९९४२, महादेव जाधव ९८२२६ १७४३१, उमेश थोपटे- ९८८१०२५५०० यांच्याशी संपर्क साधावा.

तिकीट रक्कम- ५०० व ३०० रुपये.
कधी- गुरुवार ५ जून २०२५
कोठे- गदिमा सभागृह, विद्यानगरी, बारामती
वेळ- संध्याकाळी सहा वाजता.

12735

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT