पुणे

अजित पवार यांचे वक्तव्य टॉर्चर करणारे : राम शिंदे

CD

बारामती, ता. १७ : ‘‘विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या मुद्याला उपमुख्यमंत्री अजित पवार शिळ्या कढीला सातत्याने का ऊत आणत आहेत? त्यांचे वक्तव्य टॉर्चर करण्याचा प्रयत्न आहे,’’ असे सांगत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली.
बारामतीत दहीहंडीच्या कार्यक्रमानिमित्त रविवारी (ता. १७) आले असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी ही नाराजी अधोरेखित करत याबाबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी बोलायला हवे, असेही नमूद केले. वाळवा येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांना उद्देशून, ‘ते भावकीकडे लक्ष देत नाही,’ अशी मिस्कील टिपण्णी केली होती. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले होते, ‘मी लक्ष दिले म्हणून तू आमदार झाला आहेस.’ त्याबाबत माध्यमांनी विचारले असता राम शिंदे यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, ‘‘या पूर्वीही अजित पवार यांनी ही बाब जाहीररीत्या बोलून दाखविली होती. हे वक्तव्य करून अजित पवार मला सातत्याने टॉर्चर करत आहेत, सातत्याने मला नाउमेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते महायुतीतील एका पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत, त्यांना ही गोष्ट वारंवार का गिरवावी वाटते, हे तेच सांगू शकतील. त्यामुळे मुख्यमंत्री व इतर वरिष्ठ नेतेच याबाबत बोलतील. महायुतीच्या अंतर्गत वरिष्ठ नेत्यांनी याबाबत चर्चा करायला हवी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT