पुणे

बारामतीत अखेरच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम

CD

बारामती, ता. १६ : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता. १६) नगराध्यक्षपदासाठी चार तर नगरसेवक पदासाठी २९ असे एकूण ३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. दरम्यान आजपर्यंत नगराध्यक्षपदासाठी सहा तर नगरसेवकपदासाठी ५३ असे एकूण ५९ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, सर्वच प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे शेवटच्या क्षणापर्यंत समजू द्यायची नाहीत अशीच रणनीती आखलेली असल्याने अत्यंत गोपनीय पद्धतीने प्रत्येक प्रभागातील उमेदवारांची निवड केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही रविवारी (ता. १६) बारामतीत होते. दोघांनीही आपापल्या समर्थकांसमवेत या निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नगराध्यक्षपदासाठी घड्याळ विरुद्ध तुतारीची पुन्हा लढत होणार का, याकडेच सर्वांचे लक्ष आहे. सोमवारी (ता. १७) दुपारी तीन वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल असे सांगितले जात असले तरी प्रमुख पक्षांकडून धोका पत्करायचा नाही या भूमिकेतून एकेका प्रभागातून दोन किंवा तीन उमेदवारांचे अर्ज दाखल केले जाऊ शकतात, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच पॅनेलचे उमेदवार ठेवून इतरांचे अर्ज मागे घेतले जाऊ शकतात, अशीही एक शक्यता वर्तविली जात आहे. यंदा मात्र ‘कौन बनेगा नगराध्यक्ष’ याचा सस्पेन्स शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिल्याने बारामतीकरांनीही या बाबतची उत्सुकता लागून राहिली आहे.

अजित पवार काय करणार...
ज्यांनी पक्षाकडे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मागितली आहे, त्या पैकीच एक चेहरा देणार की ऐनवेळी धक्कातंत्राचा अवलंब अजित पवार करणार याबाबत उत्सुकता आहे. मुलाखतीदरम्यान तुमच्या पैकीच एकाला संधी देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितल्याचे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारांनी सांगितले. त्यामुळे ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; मुंबई-पुण्यात किती रुपये? तुमच्या शहराचा भाव पाहा

Gokul Dudh Sangh Dispute : 'गोकुळ' सुनावणीवरून दुग्ध विभागात गोंधळ; नोटिसीशिवाय सुनावणी म्हणजे अधिकाऱ्यांची हुकूमशाही, दूध उत्पादकांचा संताप

Marathi News Live Updates : गुरमीत राम रहीमला पुन्हा 21 दिवसांची फर्लो मंजूर; आतापर्यंत 17 वेळा आला तुरुंगाबाहेर

Mhasurli Clinic Inspection: खासगी दवाखान्यांत अनोळखींकडून पाहणी म्हासुर्लीत खळबळ ः महिला, पुरुषांचा समावेश; चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद

Sugar Prices Fall: साखर दरात घसरण; पण ग्राहक नाही; किरकोळ बाजारात मात्र महागच

SCROLL FOR NEXT