पुणे

बारामतीत ब्रँड्सचा बोलबाला

CD

बारामती, ता. ८ : गेल्या काही वर्षात बारामतीचे नागरीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्याने लोकांच्या राहणीमानातही बदल झाला. हा बदल हेरून बारामतीतील अनेक व्यावसायिकांनी बारामतीत ब्रँड शॉप्स सुरू करण्यास प्राधान्य दिले असून ब्रँड शॉप्सची ही मालिका दिवसेंदिवस बारामतीचा चेहरा मोहरा बदलत आहे. शहरातील अनेक दुकानांतून ब्रँडचे कपडे, चप्पल, मोबाइल, लॅपटॉप, मिठाई, खाद्यपदार्थ अशा वस्तू मिळतच होत्या. पण ज्या ब्रँडने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविलेले आहे, असे अनेक ब्रँड बारामतीत येऊ लागल्याने बाजारपेठेला वेगळी झळाळी आलेली आहे.
तरुणांमध्ये ब्रँडच्या वस्तू वापरण्याची मोठी क्रेझ आहे. बारामतीत शिक्षणाच्या निमित्ताने लाखभर विद्यार्थी वास्तव्यास असतात. अनेक बारामतीकर पुण्याला जाऊन अनेकदा खरेदी करतात, ही बाब विचारात घेत काही हुशार व्यावसायिकांनी बारामतीतच मोक्याच्या जागी ब्रँड शॉप्स सुरू केली. सुरू करण्यात आलेल्या बऱ्याचशा ब्रँड शॉप्सला ग्राहकांची चांगली पसंती मिळत असून केवळ बारामतीच नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यातूनही लोक खरेदीसाठी या दुकानातून गर्दी करतात. केवळ वस्तूंपुरतीच ही दुकाने मर्यादित नसून खाद्यपदार्थाचीही दुकाने बारामतीत चांगला व्यवसाय करत आहेत. बारामतीत ब्रँडच्या वस्तू वापरण्याची सवय वाढू लागली असल्याने अजूनही काही नवीन अशी दुकाने येत्या काळात सुरू होणार हे निश्चित आहे. बारामतीची वाढ ज्या गतीने होत आहे, ते पाहता पुण्याच्या धर्तीवरच बारामतीचे वातावरण हळूहळू बदलू लागल्याचे हे निदर्शक असल्याची बारामतीत चर्चा आहे.

बारामतीकरांच्या राहणीमानात बदल होत आहे, कंपन्यांनाही बारामती ही नवीन बाजारपेठ निर्माण झाली आहे, त्या मुळे भविष्यातही अजून अनेक ब्रँड शॉप बारामतीत येतील.
- ॲड. श्रीनिवास वायकर, बारामती

बारामतीतील ब्रँडस शॉप्स
मॅकडोनाल्ड
पिझ्झा हट
केएफसी
डॉमिनोज
मेट्रो
मोची
लुई फिलिप
व्हॅन हुसेन
रेमंड
यूएस पोलो
स्पायकर
पीटर इंग्लंड
ब्लँक बेरीज
पेपीज जीन्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident: पुण्यात नवले पुलावर पुन्हा अपघात; एकाच दिवसात दोन घटना

Viral Video : "भारतात सुट्टीसाठी भीक मागावी लागते, सिंगापूरमध्ये ‘लीव्ह’ फक्त सांगायची"! वर्क कल्चरची तफावत उघड करणारा व्हिडिओ व्हायरल

31 December Deadlines : ३१ डिसेंबर पर्यंतच करून घ्या ‘ही’ महत्त्वाची कामे; परतपरत नाही मिळणार संधी!

Smriti Mandhana : स्मृती पुन्हा मैदानात परतण्यास सज्ज! लग्न मोडल्यानंतर सरावाला सुरुवात, Photo व्हायरल

Latest Marathi News Update : मुंढवा सरकारी जमीन विक्री प्रकरणात रवींद्र तारू यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT