पुणे

बारामतीत १५८ बालकांची मोफत हृदयरोग तपासणी

CD

बारामती : येथील श्रीपाल लहान मुलांचे हॉस्पिटल, पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. ११) मोफत बालहृदयरोग निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १५८ बालकांची मोफत तपासणी केली गेली. या शिबिरात बालहृदयरोग तपासणी, निदान व तज्ज्ञांचा सल्ला मोफत देण्यात आला. या शिबिरासाठी बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. संतोष जोशी, डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. सौरभ मुथा, डॉ. प्रियांका मुथा, डॉ. समकित मुथा, डॉ. अंत्रा, डॉ. जुई, डॉ. संयोगिता यांनी उपस्थित राहून तपासणी व मार्गदर्शन केले. जन्मत: हृदयातील छिद्र, श्वास घेण्यास त्रास, निळसरपणा, वारंवार आजारी पडणे अशा लक्षणे असलेल्या बालकांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरले. या शिबिरातील बालकांवर पुढील उपचार पुण्यामध्ये मोफत केले जाणार आहेत. दोन महिने ते चार वर्षे पर्यंतच्या जवळपास २८ बालकांना अशा स्वरुपाचा त्रास होत असून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला न्यावे लागणार असून या पैकी काही बालकांवर शस्त्रक्रीयाही कराव्या लागणार आहेत. तपासण्या, उपचार व शस्त्रक्रीया मोफत केल्या जाणार असल्याचे डॉ. सौरभ मुथा यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: इराणच्या युद्धात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू; ड्रोन हल्ल्यात भारतातील तिघे ठार

Mumbai News: व्हॉट्सॲप चॅट घटस्फोटाचे कारण असू शकत नाही - उच्च न्यायालय

४० दिवसांपासून कांदा ७ ते १० रुपये किलो कांद्याला प्रतिक्विंटल ५०० ते १००० अनुदानाची मागणी; सोलापूर ‘एपीएमसी’त १४९२८ ट्रक कांदा विकून शेतकऱ्यांना मिळाले अवघे ११८ कोटी

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Nandurbar News : काठीच्या राजवडी होळीचे होणार जागतिक ब्रँडिंग; आदिवासी विकास मंत्र्यांनी धडगावच्या भोंगऱ्या बाजारात धरला ठेका!

SCROLL FOR NEXT