पुणे

बारामतीत भाजपकडून राष्ट्रवादीला टक्कर देण्याचा प्रयत्न

CD

बारामती, ता. २२ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुपे व शिर्सुफळ पंचायत समिती गणात एबी फॉर्मवरील अधिकृत उमेदवारच दिलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त झाले. तसेच, राष्ट्रवादीने यंदा नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे भाजपनेही मोट बांधण्याचा प्रयत्न केला असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
राष्ट्रवादीचे ध्येय जिल्हा परिषदेच्या अधिकाधिक जागा निवडून आणण्याकडे असल्यामुळे पंचायत समितीच्या जागांबाबत तडजोड करून जिल्हा परिषदेतील स्थान बळकट करण्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर दिल्याचे सूत्रांनी सांगितले. एकीकडे नीरावागज गटात अभिजित देवकाते या भाजपच्या नेत्याच्या पत्नी शिवानी यांना राष्ट्रवादीत घेत अजित पवार यांनी तिकीट दिले, तर दुसरीकडे शिर्सुफळ गणात बाळासाहेब गावडे यांचा मुलगा अनिकेत गावडे याच्या विरोधात, तर सुपे गणात उज्ज्वला पोपट खैरे यांच्या विरोधात उमेदवार न देत जिल्हा परिषदेची निवडणूक सोपी करण्याचा राजकीय डाव अजित पवार यांनी टाकल्याचे मानले जात आहे. उज्ज्वला खैरे यांचे नाव राष्ट्रवादीच्या यादीत असले तरी भाजपचे नेते दिलीप खैरे यांनी मात्र त्या भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढवतील, असे स्पष्ट केले आहे.
पणदरे गटात मंगेश प्रतापराव जगताप यांना जिल्हा परिषदेचे तिकीट देत माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेसची नाराजी दूर करत बेरजेचे गणित त्यांनी साधले आहे. येथे जगताप कुटुंबियांपैकी एक असलेल्या अरविंद जगताप यांचे चिरंजिव सूरज जगताप यांना भाजपने संधी दिली आहे.
निंबूत गटात यंदा प्रथमच तालुक्याच्या पश्चिम भागाऐवजी कांबळेश्वरचे पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे यांना तिकीट दिले गेले. माजी जिल्हा परिषद सदस्या असलेल्या मीनाक्षी तावरे यांचे पती व राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष किरण तावरे यांना पणदरे गणातून संधी दिली गेली. बारामतीच्या राष्ट्रवादी भवनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे प्रशासकीय कामकाज कुशलतेने सांभाळणाऱ्या नितीन अरुण काकडे यांना अजित पवार यांनी यंदा नीरावागज गणातून उमेदवारी देऊ केली आहे.

भाजप- शिवसेना युतीचे प्रयत्न
अजित पवार यांना ताकदीनिशी लढत देण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याचे भाजपचे सरचिटणीस अविनाश मोटे यांनी सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनीही राष्ट्रवादी व भाजपची बारामतीत कसलीच युती नसल्याचे एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही भाजपसोबत युती केली जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांनी नमूद केले आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसानंतरच चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Prices : इराण-अमेरिका युद्धाचा थेट फटका! गॅस सिलिंडर महाग; आजपासून नवे दर लागू, किती झाली किंमत?

अग्रलेख : उजेडातील रोषणाई!

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT