पुणे

कॉर्फबॉल स्पर्धेच्या कर्णधारपदी बारामतीचा निखिल गोफणे

CD

बारामती, ता. १२ : फगवारा (पंजाब) येथे १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या २२ व्या फेडरेशन कप कॉर्फबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र कॉर्फबॉल असोसिएशनतर्फे ही घोषणा झाली. कॉर्फबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य डॉ. प्रवीण मानवतकर व असोसिएशनचे सचिव किशोर बागडे यांनी हा संघ जाहीर केला. या संघाच्या कर्णधारपदी बारामतीचा निखिल गोफणे, तर उपकर्णधारपदी अहिल्यानगरची साजरी परदेशी यांची निवड झाली आहे.
कॉर्फबॉल हा स्त्री-पुरुष समानतेवर आधारित खेळ असून एका संघात सात पुरुष व सात महिला एकत्र खेळतात. महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय स्तरावर सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केल्याचे डॉ. मानवतकर यांनी सांगितले. निखिल गोफणे, हर्ष मोहिते, वाहिद मुलाणी, नंदराज मालुसरे, सई साष्टे, पूजा पांढरे, निशा पंडिया (पुणे), सई मोहिते, संस्कृती पाटील (पिंपरी-चिंचवड), दिशान गांधी, साजरी परदेशी, भक्ती परदेशी (अहिल्यानगर), आदित्य करचे (सोलापूर) व प्रतीक कंग्राळकर (मुंबई) यांचा या संघात समावेश आहे. तर, संघ व्यवस्थापक म्हणून केतन भापकर यांची नियुक्ती केली आहे.
या संघाचे प्रशिक्षण शिबिर बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर नुकतेच पार पडले. प्राचार्य डॉ. अविनाश जगताप तसेच प्रशिक्षक डॉ. गौतम जाधव व अतुल खोमणे यांनी संघाला शुभेच्छा देऊन पंजाबकडे रवाना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs ZIM : झिम्बाब्वेचा खळबळजनक विजय! ऑस्ट्रेलियाला १९ वर्षानंतर नमवले; सुपर कॅच, भन्नाट गोलंदाजी अन् सुरेख फलंदाजी...

Bhante Surei Sasai Viral Video : भंते ससाई यांनी महिलेवर हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल; विविध संघटना आक्रमक, अध्यक्षपदावरून हकालपट्टीची मागणी

Kolhapur crime News Today : घरातील पैशांच्या वादातून मुलाकडून वडिलांचा खून; कोल्हापुरातील शाहूवाडीमध्ये खळबळ

Maha Shivratri 2026: भोलेनाथाच्या दरबारात समान हक्क! महाशिवरात्री 2026 ला त्र्यंबकेश्वरमध्ये VIP दर्शन बंद, जाणून घ्या काय झाले बदल

IND vs PAK : पाकड्यांनी लायकी दाखवली! इंग्लिश फॅन्सला धक्काबुक्की, धमकी अन्... पाकिस्तानी मार खाणारच होता, पण... Video

SCROLL FOR NEXT