बारामती, ता. २० : येथील जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात गुरुवारी (ता. १९) शिवजयंती साजरी करण्यात आली. प्राथमिक विभागात विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगते, पोवाडे व देशभक्तिपर गीतांद्वारे शिवरायांचा जीवनपरिचय प्रभावीपणे सादर केला. चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘गड आला पण सिंह गेला’ या प्रसंगावर आधारित लघुनाटिका सादर केली. सूत्रसंचालन अजिंक्य साळी यांनी केले.
गुरुकुल विभागात प्रमुख वक्ते म्हणून निवृत्त प्राध्यापक मानाजी मारुती गावडे यांनी भाषणातून शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत विद्यार्थ्यांना राष्ट्रनिष्ठा, शौर्य व संघटनशक्तीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी ‘अखंड सूर्यनमस्कार’ उपक्रमात सहभाग घेत अखंड सूर्यनमस्कार पूर्ण करणाऱ्या ७४ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी उपाध्यक्ष किरण शहा (वाडीकर), सचिव सतीश गायकवाड, राजीव देशपांडे, गुरुकुलचे आचार्य हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक अतुल कुटे, बालभवन प्रमुख नीलेश भोंडवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गुरुकुल विभाग कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित रेवडे यांनी केले. शिवजयंतीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष किशोर शिवरकर, हृषीकेश घारे, सतीश धोकटे उपस्थित होते.
14494
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.