चौकशीला गती देण्याची राष्ट्रवादीची मागणी
बारामती, ता. २६ : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी सुरू असलेल्या तपासाला गती मिळायला हवी अशी मागणी गुरुवारी (ता. २६) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.
बारामती शहर पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. नगराध्यक्ष सचिन सातव, ज्येष्ठ माजी नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल, शहराध्यक्ष किरण इंगळे यांनी या बाबतची मागणी केली. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, युवानेते पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे, डीजीसीए यांच्याकडून संबंधित विमान कंपनीवर कारवाई सुरु आहे, जय पवार यांनीही या संदर्भात चौकशीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर हा खरच अपघात होता की घातपात होता याची सखोल चौकशी व्हावी अशी राष्ट्रवादीचीही भूमिका असून त्याबाबत मुख्यमंत्री व केंद्रीय स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे या पत्रकार परिषदेत नमूद केले गेले. या तपासामध्ये ज्या बाबी निष्पन्न होतील, त्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी संबंधित व्यक्ती किंवा संस्थांवर सक्षम प्राधिकरणाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात अनेक उलटसुलट बातम्या येत आहेत, मात्र तरिही अधिकृतपणे ब्लॅकबॉक्स सुरक्षित आहे, अशी माहिती मिळालेली असून त्यानुसार पुढील कारवाई व्हावी असे नमूद केले गेले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यात केलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे पत्र पाठवून या अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केलेली आहे, ही बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. या प्रक्रियेला गती मिळावी अशी पक्षाची मागणी असल्याचे नमूद केले गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.