पुणे

बारामतीकर जाणार ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाला

CD

बारामती, ता. २८ : शासनाच्या अल्पसंख्याक विभागामार्फत ‘हिंद दी चादर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, गुरू तेग बहाद्दूर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागम दिनानिमित्त रविवारी (ता. १) मुंबईतील खारघर येथे हा सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवारही येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. या कार्यक्रमासाठी बारामती गुरुद्वारा कमिटीच्या वतीने भाविकांना बारामतीहून घेऊन जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार स्वप्निल रावडे, तसेच नगरपरिषदेचे गटनेते नगरसेवक संजय संघवी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष किरण इंगळे आणि महेश आगवणे यांचे सहकार्य मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. उपक्रमाचे नियोजन प्रवीण आहुजा, जगदीश पंजाबी, ब्रह्मप्रकाश खत्री, संजय आहुजा, लक्ष्मीकांत रोहाणी, मोहन भटियानी, पवन आहुजा, रमेश पंजाबी, संजय गुरुवाडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gokul Politics : पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेले सहायक दुग्ध निबंधक कदम यांची तडकाफडकी बदली, गोकुळचे राजकारण तापलं; मुश्रीफांना अप्रत्यक्ष दणका

IPL 2026: कोलकता संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; गुजरातशी आज अहमदाबादमध्ये लढणार, रहाणेच्या नेतृत्वाचा कस, कशी असेल Playing XI

Leopard Rescue Chalisgaon : शिकारीच्या नादात बिबट्या पडला विहिरीत, पण शेतकऱ्याच्या एका फोनमुळे वाचले आयुष्य; चाळीसगावातील रेस्क्यूचा असा झाला शेवट

Beed News: बीडमध्ये उष्णतेचा कहर; दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट; तापमान ४२°C; शहरात उन्हाचा कडाका पाहायला मिळाला

इंडिया आघाडीच्या एकजुटीने मोदी सरकारची उडाली झोप, मोदी-शहांना आता विरोधकांत फुटीची आशा

SCROLL FOR NEXT