पुणे

बारामतीत विद्यार्थ्यांकडून विविध प्रकल्प सादर

CD

बारामती, ता. ११ : येथील विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘स्टीम’ (रोबोटिक्स) तसेच विज्ञान, कला आणि सामाजिक शास्त्र एक्स्पो नुकताच पार पडला. ‘स्मार्ट सिटी बारामती’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाचे उद्‍घाटन मळदच्या केंद्रप्रमुख शोभा होळकर यांनी केले.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान, विज्ञान, मानवशास्त्र आणि कला यांचा अद्भुत संगम साकारला. रोबोटिक्स क्षेत्रातील १३९ बालवैज्ञानिकांनी सादर केलेले ३८ प्रगत प्रकल्प विशेष आकर्षण ठरले. पाहुण्यांचे स्वागत करणाऱ्या ‘बारामती-बॉट’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रोबोटिक्ससोबत विज्ञान, कला व सामाजिक शास्त्रांवर आधारित ११५ प्रयोग सादर करण्यात आले. यात पर्यावरण संतुलन, जलसंधारण, मृदा संधारण, गॅस गळती डिटेक्टर, स्मार्ट सोलर एसी, कार्बन शुद्धीकरण आणि नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा वापर यासंबंधी प्रयोगांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देण्यासाठी चित्रकला, हस्तकला आणि टिकाऊ वस्तूंच्या प्रतिकृतींचे दालन सजवले होते. ऐतिहासिक वारसा, भौगोलिक रचना आणि विविध देशांचे ध्वज रांगोळीच्या माध्यमातून मांडले गेले. प्राचार्या जॉयसी जोसेफ यांनी या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती, तांत्रिक कौशल्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाल्याचे नमूद केले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प
स्मार्ट नागरी व्यवस्थापन व वाहतूक नियोजनासाठी सिग्नल फ्लो
सुरक्षित पार्किंगसाठी सिक्युअर गेट
प्रदूषण नियंत्रणासाठी ॲटमॉस स्कॅन
हृदय गती मोजणारे कार्डिओ गार्ड
तातडीच्या औषध पुरवठ्यासाठी मेडिकल ड्रोन
उद्योगांसाठी रोबोफ्लेक्स (रोबोटिक हात)
थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचे सादरीकरण

14621

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, काय दिलं कारण?

NEET (UG) 2026: नीट (यूजी) २०२६ अर्जातील दुरुस्तीची संधी; १४ मार्चपर्यंत तपशील बदलता येणार

Pune News: युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत टोमॅटो, कांद्याचे भाव वाढले; आयात तात्पुरती थांबली, टोमॅटो अडीचशे तर कांदा पावणे दोनशे रुपये किलाे!

Thane News: ठाणेकरांसाठी मोठा दिलासा! प्रॉपर्टी टॅक्सच्या दंडावर तब्बल 90% सूट जाहीर; अंतिम मुदत किती? जाणून घ्या...

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

SCROLL FOR NEXT