पुणे

बारामतीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई

CD

बारामती, ता. १२ : इराण- अमेरिका युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असून, बारामती शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे हॉटेल, मिठाई (स्वीट होम), तसेच इतर खाद्य व्यावसायिक अडचणीत सापडले असून, पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बारामतीत सुमारे २५० हॉटेल व्यावसायिक, ६० मिठाई दुकानदार, तसेच इतर सर्व मिळून ४०० व्यावसायिक या व्यवसायावर अवलंबून आहेत. सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय सुरळीतपणे चालवणे कठीण झाले आहे.
घरगुती गॅस सिलिंडरप्रमाणे २१ दिवसांनी सिलिंडर उपलब्ध होतो. मात्र, हॉटेल व खाद्य व्यवसायासाठी दररोज मोठ्या प्रमाणात गॅसची गरज असते. त्यामुळे व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी व्यावसायिक सिलिंडर किमान एक दिवसाआड उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. सिलिंडरचा पुरवठा झाला नाही तर येत्या आठवड्यात अनेक हॉटेल व मिठाई व्यवसाय बंद पडण्याची शक्यता असून, बाहेरून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ शकते. या व्यवसायांवर अवलंबून असलेल्या कामगारांच्या रोजगारावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने, तसेच बारामती प्रांत कार्यालयाने तातडीने लक्ष घालून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी हॉटेल व्यापारी व बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने शैलेश साळुंके, प्रवीण आहुजा, स्वप्नील मुथा, जगदीश पंजाबी व सुशील सोमाणी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balen Shah: सीमा वादावर बालेन शाहांना ‘सायलेंट मोड’वर कोणी टाकलं? नेपाळमध्ये मोठा राजकीय निर्णय, आता फक्त शिशिर खनालच बोलणार

Latest Marathi News Live Update : दूषित पाणीपुरवठ्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

Chess Champion: कार्लसन विसरा, जगाला हादरवणारा 'हा' भारतीय खेळाडू ठरतोय सर्वात धोकादायक; दिग्गजाचा मोठा दावा!

Horoscope : येत्या 72 तासांत बनतोय धनयशस्वी योग! 'या' 5 राशींना मिळणार विशेष लाभ; आर्थिक भरभराटीसह कुटुंबात येईल मोठी खुशखबर

Police Officers Transfer : पुणे ग्रामीण पोलीस दलात ३० अधिकाऱ्यांच्या बदल्या: पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी आदेश केले जारी

SCROLL FOR NEXT